Shikrapur Crime : लॉजच्या नावाखाली चालत होता वेश्या व्यवसाय; पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून केला पर्दाफाश

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – येथील पाबळ चौक परिसरातील एका लॉजवर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी लॉज चालक संतोष सिना पुजारी याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.शिक्रापूर येथील पाबळ चौक परिसरातील ‘शारदा लॉज’वर बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार रोहिदास पारखे, विकास पाटील, महिला पोलीस शिपाई किरण निकम यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला.दरम्यान, लॉज चालकासह वेश्याव्यवसाय करणारी एक सापडली. लॉज चालक संतोष सिना पुजारी (सध्या रा. शिक्रापूर, मूळ रा. शेडमणी, कर्नाटक) याने तिला वेश्याव्यवसायासाठी प्रोत्साहित केल्याचे महिलेने सांगितले. याबाबत महिला पोलीस शिपाई किरण नाना निकम यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे करत आहेत.

The post Shikrapur Crime : लॉजच्या नावाखाली चालत होता वेश्या व्यवसाय; पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून केला पर्दाफाश appeared first on Dainik Prabhat.

Source

Join Our WhatsApp Group!