Sharad Pawar : बिहारचा निकाल EVM मधून कसा आला? शरद पवार यांनी केलं असं विश्लेषण; देशभरात चर्चांना उधाण

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बिहार निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली.  शरद पवारांनी बिहार निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, या निवडणुकीत महिलांचा मोठा सहभाग दिसून आला आणि त्याचा परिणाम म्हणून सरकारने महिलांच्या खात्यात जमा केलेल्या १० हजार रुपयांच्या योजनेचा निकालावर प्रभाव पडला असावा.

शरद पवारांनी निवडणुकीच्या आधी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप करणे हे योग्य नसल्याचे म्हणत यावर त्यांनी चिंता बोलून दाखवली. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देत, सरकारी निधीचा वापर निवडणुका जिंकण्यासाठी करणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे पवार म्हणाले. यामुळे निवडणूक प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी आणि निवडणुका स्वच्छ व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शरद पवारांनी केली.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!