Satara News : सातारा औद्योगिक क्षेत्रातील समस्या व विकासात्मक धोरणाबाबत चर्चा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
सातारा : कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व आमदार महेश शिंदे यांनी मास भवनला भेट देत मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) पदाधिकार्‍यांशी सातारा औद्योगिक क्षेत्रातील समस्या व विकासात्मक धोरणाबाबत चर्चा केली.यावेळी परदेशी उद्योजक पीटर केर व रिचर्ड यांनी मासभवनला भेट देऊन सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगाबाबत मास पदाधिकार्‍यांशी चर्चा केली.

यावेळी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) च्या वतीने अध्यक्ष संजोग मोहिते यांनी महेश शिंदे व परदेशी उद्योजकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, मास उपाध्यक्ष अनुप मुथा, सचिव दीपक पाटील, सहसचिव केतन कोटणीस, मास चे माजी अध्यक्ष राजेंद्रकुमार मोहिते, मास कार्यकारिणी सदस्य धैर्यशील भोसले, गोपीचंद भोसले, मदन जाधव, संग्रामसिंह कोरपे, ईशान मळेकर, नीरज गांधी आदी उपस्थित होते.

अमेरिकेतील उद्योजकांना नवीन प्रोजेक्टसाठी होणार सहकार्य
अमेरिका स्थित संरक्षण सामग्री बनविणारी व एरोस्पेस टेक्नॉलाजी मध्ये जागतिक स्तरावरील आघाडीची समजल्या जाणार्‍या डेक्राफ्ट सिस्टिम्स या कंपनीचे संचालक पीटर केर व रिचर्ड यांनी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांशी संवाद साधला. सातार्‍यातील उद्योजक, त्यांची कार्यप्रणाली व जागतिक दर्जाचे उत्पादन करण्याची गुणवत्ता, हातोटी व क्षमता याबाबत मास संचालक धैर्यशील भोसले यांनी परदेशी उद्योजकांना माहिती देऊन त्यांच्या नियोजीत प्रोजेक्टसाठी सातारा उद्योग क्षेत्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वस्त केले.

The post Satara News : सातारा औद्योगिक क्षेत्रातील समस्या व विकासात्मक धोरणाबाबत चर्चा appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!