
satara news: बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित रालोआने मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल सातार्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जल्लोष केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत मोती चौकामध्ये पेढे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, पालिकेतील माजी पक्षप्रतोद सिद्धी पवार, सुनिशा शहा, अविनाश चिखलीकर, विजय काटवटे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी व पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मोती चौकात सायंकाळी उशिरा आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महिला सदस्यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना पेढा भरवला. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआचा बिहारमधील विजय ऐतिहासिक आहे. हा विजयरथ यापुढेही असाच दौडत राहण्यासाठी संघटितपणे साथ देऊया.
The post satara news: बिहार निवडणुकीतील विजयाचा सातार्यात जल्लोष appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











