
महाबळेश्वर – भारतातील ग्रामीण संस्कृती, शेती पद्धती आणि पारंपरिक जीवनशैली जाणून घेण्यासाठी बेल्जियम देशातील विद्यार्थ्यांच्या पथकाने अलीकडेच दरे गावाला अभ्यासदौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली. या भेटीचा उद्देश भारतीय ग्रामीण भागातील जीवनमान, संस्कृती आणि स्वावलंबी जीवनपद्धतीचा अभ्यास करणे हा होता.
ST. Xavier School Panchgani यांच्या मार्फत cultural Exchange कार्यक्रमाअंतर्गत दरे गावची निवड करण्यात आली. या दौऱ्या साठी बेल्जियम देशातील २६ विद्यार्थी व ४ शिक्षकांनी दरे गावास भेट दिली.यांच्या समवेत सेट. Xavier School Panchgani शाळेचे विद्यार्थी तसेच शिक्षक यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या आगमना वेळी गावातील सरपंच श्री.गणपत मोरे, पोलिस पाटील श्री.नामदेव गायकवाड, प्रतिष्ठित व्यक्ती श्री.विश्वनाथ गायकवाड शिक्षकवृंद, आरोग्यसेवक तसेच ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात आणि लेझीम नृत्याच्या सादरीकरणातून त्यांचे स्वागत केले. गावातील महिलांनी आरती करून पाहुण्यांचे स्वागत केले.
स्वागत समारंभानंतर विद्यार्थ्यांचा पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घेण्यासाठी काही निवडक घरांमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांनी पारंपरिक भाकर बनवण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. काही विद्यार्थ्यांनी स्वतः भाकर थापण्याचाही प्रयत्न केला.ST. Xavier School Panchgani या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ट्रान्सलेटर म्हणून भूमिका उत्तमरित्या पार पाडली.
यानंतर गावातील महिलांनी ताक बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच मधमाशी पालनाचे (बी कीपिंग) प्रात्यक्षिक दाखवून ग्रामीण उद्योजकते बद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. नदीकिनारी खेकडे पकडण्याचे पारंपरिक कौशल्यदेखील विद्यार्थ्यांनी रस घेऊन पाहिले.
या अभ्यासदौऱ्यामुळे बेल्जियमच्या विद्यार्थ्यांना भारतीय ग्रामीण संस्कृती, अन्नपदार्थांची निर्मिती, शेतीशी निगडित जीवनपद्धती आणि सामाजिक एकोप्याची जाणीव झाली. त्यांनी भारतीय लोकजीवनाबद्दल समाधान व्यक्त करत गावकऱ्यांच्या आत्मीय स्वागताचे कौतुक केले.
गावातील नागरिक, शाळेचे शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. दरे गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणाऱ्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
The post Satara news : दरे गावात बेल्जियमच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा; ग्रामसंस्कृतीचा घेतला अनुभव” appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











