
Who will be the captain of RR after Sanju Samson : आयपीएल २०२६ मध्ये संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स (RR) कडून खेळणार की नाही, याबद्दलचे सस्पेन्स अजूनही कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान रॉयल्स व्यवस्थापन सॅमसनला दुसऱ्या फ्रेंचायझीसोबत ‘ट्रेड’ करण्याबाबत सक्रियपणे चर्चा करत आहे. राजस्थानचा संघ चेन्नई सुपर किंग्स (CSK) सोबत डील निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. अशात सॅमसन ट्रेड झाल्यानंतर कर्णधारपदाच्या शर्यतीसाठी कोणामध्ये चुरस आहे? जाणून घेऊया.
मागील आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघ फारच खराब ठरला होता. १४ पैकी केवळ ४ सामने जिंकून त्यांना १० सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. संजू सॅमसन राजस्थान सोडणार की नाही, हा जरी मोठा प्रश्न असला तरी, जर त्याची टीममधून एक्झिट झाली तर संघाची कमान कोण सांभाळणार? या प्रश्नाची चर्चा आता सुरू झाली आहे. सॅमसनची जागा घेण्याच्या शर्यतीत तीन युवा भारतीय खेळाडूंची नावे सर्वात पुढे आहेत.
कोण असेल राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार?
संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सपासून फारकत घेतल्यास, संघाचे कर्णधारपद मिळवण्याच्या शर्यतीत यशस्वी जैस्वाल सर्वात पुढे आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यशस्वीला ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. यशस्वी बऱ्याच काळापासून राजस्थान संघाचा महत्त्वाचा भाग असून त्याने प्रत्येक हंगामात प्रभावी कामगिरी केली आहे.
यशस्वीसोबतच, युवा अष्टपैलू खेळाडू रियान पराग याचे नावही या शर्यतीत आहे. गेल्या हंगामात रियान परागने सॅमसनच्या गैरहजेरीत राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते, त्यामुळे तो पण कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार आहे. तसेच ध्रुव जुरेलने पण या शर्यतीत आपली दावेदारी दाखल केली आहे. जुरेलने मागील हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांत १५६ च्या दमदार स्ट्राईक रेटने ३३३ धावा केल्या होत्या. तसेच, इंडिया-ए आणि भारतीय संघात मिळत असलेल्या संधींचा फायदा तो पुरेपूर उचलत आहे.
संजू सॅमसन कोणत्या टीममध्ये जाणार?
संजू सॅमसनला ट्रेड करण्याची चर्चा अजूनही सुरू आहे. राजस्थान रॉयल्सचे अधिकारी सतत चेन्नई सुपर किंग्सच्या संपर्कात आहेत. सुरुवातीच्या रिपोर्ट्सनुसार, राजस्थानने सॅमसनच्या बदल्यात चेन्नईकडून ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवी यांना संघात घेण्याची मागणी केली होती. चेन्नई स्टब्सला ट्रेड करण्यास तयार होती, पण त्यांनी रिझवीच्या नावावर ही डील थांबवली.
हेही वाचा – Ajinkya Naik : अजिंक्य नाईक बिनविरोध! MCA अध्यक्षपदावर दुसरा कार्यकाळ पक्का, दिग्गजांची माघार
आता असे मानले जात आहे की, राजस्थानने सॅमसनच्या बदल्यात चेन्नईच्या दोन मोठ्या खेळाडूंना, म्हणजेच रवींद्र जडेजा आणि मथीशा पथिराना यांना आपल्या संघात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. मात्र, यापैकी कोणतीही डील अजून अंतिम झालेली नाही.
The post Sanju Samson : संजू सॅमसनच्या एक्झिटनंतर RR ची कमान कोण सांभाळणार? ‘या’ तिघांमध्ये जोरदार चुरस! appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











