
Rupali Thombare Patil | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत रुपाली ठोंबरे पाटील यांनी सातत्याने टीका केली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने रुपाली ठोंबरे पाटील यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यानंतर पक्षाने नोटीस बजावली नसून खुलासा पत्र दिल्याची सारवा सारव रुपाली पाटील यांनी केली होती.
मात्र ठोंबरे पाटील यांचा खुलासा येण्यापूर्वीच राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. राष्ट्रवादीने त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली आहे. राष्ट्रवादीने आज नव्या 17 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन प्रवक्त्यांच्या यादीमध्ये रुपाली ठोंबर यांना स्थान देण्यात आले नाही. या कारवाईनंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या रुपाली पाटील ठोंबरे?
नमस्कार जय महाराष्ट्र…मी आज पुण्याच्या बाहेर आहे,प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे. त्यात माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत. पक्षाचे काम जोमाने करणार आहोत.या यादी बद्दल अजित पवारांना भेटून बोलून या विषयी माहिती घेईल मग आपल्या सर्वांशी सविस्तर बोलेल, असं रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या.
कोणावर सोपवली प्रवक्तेपदाची जबाबदारी ?
राष्ट्रवादीने अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सुरज चव्हाण, विकास पासलकर आणि श्याम सनेर यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, रूपाली पाटील आणि चाकणकर या दोघी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गटाच्या) महिला पदाधिकारी असून, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या दरम्यान वाद सुरू आहे. फलटण येथे महिला डॉक्टरच्या मृत्यूच्या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली होती. मात्र आता पक्षाच्या प्रवक्ते पदावरून रूपाली ठोंबरे यांची उचलबांगडी करण्यात आल्याने त्या पुढे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Rupali Thombare Patil |
The post Rupali Patil Thombare : राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर रुपाली पाटलांची पोस्ट चर्चेत appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











