
तिरुवनंतपुरम: एर्नाकुलम ते बंगळूरु दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) गीत गाऊन घेतल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दक्षिणी रेल्वेवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या कृतीला ‘धोकादायक पाऊल’ आणि ‘संवैधानिक तत्त्वांचे घोर उल्लंघन’ म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, सांप्रदायिक विचारधारा आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेचे गीत अधिकृत कार्यक्रमात समाविष्ट करणे स्वीकारार्ह नाही. त्यांनी असा आरोप केला की, रेल्वेसारख्या प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थेचा वापर संघ परिवाराच्या सांप्रदायिक राजकीय प्रचारासाठी केला जात आहे.
The @GMSRailway making students sing the RSS anthem at the flag-off of the Ernakulam–Bengaluru Vande Bharat Express is highly condemnable. Including the anthem of an organisation known for its communal ideology and hate mongering in an official event is a blatant violation of…
— Pinarayi Vijayan (@pinarayivijayan) November 8, 2025
विजयन म्हणाले, “रेल्वेने स्वातंत्र्य लढ्यादरम्यान धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची भूमिका निभावली होती, पण आता ती सांप्रदायिक अजेंड्याचे समर्थन करत आहे.” हे गीत सोशल मीडियावर ‘देशभक्ती गीत’ म्हणून सामायिक करून स्वातंत्र्य चळवळीचा आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला.
वंदे भारतच्या उद्घाटन समारंभात उग्र हिंदुत्ववादी राजकारणाची घुसखोरी झाल्याचे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी या घटनेमागे धर्मनिरपेक्षता नष्ट करण्याची संकुचित राजकीय सोच असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सर्व धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी शक्तींना या प्रवृत्तीचा एकजुटीने विरोध करण्याचे आवाहन केले आहे. या वादग्रस्त घटनेवर दक्षिणी रेल्वेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
The post वंदे भारतमध्ये RSSचे गीत: केरळच्या मुख्यमंत्र्यांचा तीव्र आक्षेप appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











