Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने मोडला कपिल देव यांचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड

Ravindra Jadeja
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे, तो आयपीएल २०२६ हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्स (CSK) सोडून राजस्थान रॉयल्स (RR) मध्ये सामील होत असल्यामुळे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका विरुद्ध कोलकात्यातील पहिल्या कसोटी सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४,००० धावा पूर्ण करून जगातील चौथा अष्टपैलू खेळाडू होण्याचा पराक्रम केला आहे.

दुहेरी विक्रम : ४,००० धावा आणि ३०० विकेट्स
रवींद्र जडेजाच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ३०० हून अधिक गडी बाद करण्याची नोंद आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये ३०० हून अधिक गडी बाद करणारा आणि ४००० हून अधिक धावा करणारा जगातील चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. या विक्रमाच्या यादीत कपिल देव, इयान बॉथम आणि डॅनिअल विटोरीसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये ४००० हून अधिक धावा आणि ३०० हून अधिक गडी बाद करणारे गोलंदाज
इयान बॉथम- (५२०० धावा, ३८३ विकेट)
कपिल देव- (५२४८ धावा, ४३४ विकेट)
डॅनिअय विटोरी- ( ४५३१ धावा, ३६२ विकेट)
रवींद्र जडेजा- (४००० धावा, ३३८ विकेट)

जडेजाने मोडला कपिल देव यांचा विक्रम
या सामन्यात ४००० धावांचा पल्ला गाठताच जडेजाच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली. कसोटी क्रिकेटमध्ये तो सर्वात जलद ४००० धावांचा पल्ला गाठणारा आणि ३०० हून अधिक गडी बाद करणारा पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. तर जगातील दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम त्याने आपल्या ८७ व्या सामन्यात करून दाखवला आहे. तर अव्वल स्थानी असलेल्या इयान बॉथम यांनी हा पराक्रम आपल्या कारकिर्दीतील ७२ व्या सामन्यात करून दाखवला होता.

आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड: जडेजा RR मध्ये परत, सॅमसन CSK कडे
आयपीएल २०२६ हंगामापूर्वी रिटेन्शन डेडलाइननिमित्त झालेल्या ट्रेड विंडोमध्ये CSK आणि RR यांच्यात मेगा स्वॅप डील झाली. १२ हंगाम CSK सोबत खेळणाऱ्या जडेजाने संघाची साथ सोडली आणि आपल्या आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवातीचा संघ RR मध्ये परतण्याचा निर्णय घेतला. ही डील आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या ट्रेडपैकी एक मानली जात आहे.

या डीलनुसार, RR ला जडेजा आणि इंग्लिश अष्टपैलू सॅम करन मिळाले, तर CSK ला RR चा माजी कॅप्टन आणि विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन मिळाला. जडेजाची मूळ फी १८ कोटींवरून आता १४ कोटी झाली, तर सॅमसनला १८ कोटी कायम राहतील. जडेजा २००८ मध्ये RR सोबतच आयपीएल डेब्यू करून पहिल्या हंगामात विजेतेपद जिंकला होता. या ट्रेडमुळे RR ला अनुभवी नेतृत्व आणि संतुलन मिळेल, तर CSK च्या फलंदाजीला मजबुती मिळेल. सॅम करनची फी २.४ कोटी कायम राहील.

The post Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने मोडला कपिल देव यांचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!