Ranji Trophy 2025 : औकिब नबीचा रणजीत ‘कहर’! चार सामन्यात तिसऱ्यांदा ५ विकेट्स घेण्याचा केला पराक्रम

Auqib Nabi's 5-wicket haul rattles Delhi in Ranji Trophy
Aaqib Nabi’s 5 wicket haul rattles Delhi in Ranji Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या रणांगणासोबतच भारतीय क्रिकेटचा देशांतर्गत हंगाम अर्थात रणजी ट्रॉफी देखील जोरदार सुरू आहे. या स्पर्धेत जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबी सातत्याने आपल्या भेदक गोलंदाजीने छाप सोडत आहे. त्याने शनिवारी (८ नोव्हेंबर) रोजी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा पाच विकेट्स घेण्याची किमया साधली. विशेष म्हणजे, या हंगामात त्याने तिसऱ्यांदा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

चार फलंदाजांना शून्यावरच दाखवला तंबूचा रस्ता –

जम्मू-काश्मीर आणि दिल्ली यांच्यात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या पहिल्याच दिवशी औकिब नबीच्या गोलंदाजीचा दिल्लीच्या फलंदाजांना सामना करणे कठीण झाले. औकिब नबीने अर्पित राणाला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर आबिद मुश्ताक आणि वंशराज शर्मा यांनी मधल्या फळीतील फलंदाजांना फार काळ टिकू दिले नाही आणि 182 धावांपर्यंत दिल्लीचे 5 फलंदाज बाद झाले.

शेवटच्या 5 विकेट्सपैकी 4 विकेट्स औकिबच्या नावावर –

यानंतर औकिबनबीने दिल्लीच्या तळाच्या फळीला गुंडाळायला वेळ लावला नाही. त्याने शेवटच्या 5 पैकी 4 विकेट्स स्वतःच्या नावावर केल्या. त्याने एकूण 16 षटके गोलंदाजी करत केवळ 35 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या.औकिबच्या या 5 विकेट्स हॉलची सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे त्याने बाद केलेल्या 5 फलंदाजांपैकी 4 फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत. फक्त ऋतिक शौकीन हा एकमेव फलंदाज होता, ज्याला औकिब नबीने बाद केले आणि त्याने 7 धावा केल्या होत्या.

हेही वाचा – PAK vs SA : निवृत्ती माघार घेतलेल्या क्विंटन डी कॉकचा मोठा धमाका! कोहली-विल्यमसनला मागे टाकत केला खास पराक्रम

6 डावात घेतल्या 24 विकेट्ससह –

  • औकिब नबीने या हंगामाच्या पहिल्या सामन्यापासूनच आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतले आहे.
  • या हंगामातील 4 सामन्यांमध्ये त्याने तिसऱ्यांदा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
  • केवळ छत्तीसगडविरुद्धच्या मागील सामन्यात तो कमी प्रभावी ठरला होता आणि त्याने 2 विकेट्स घेतल्या होत्या.
  • यापूर्वी, त्याने मुंबईविरुद्धच्या दुसऱ्या डावात आणि राजस्थानविरुद्धच्या दुसऱ्या डावातही प्रत्येकी 7 विकेट्स घेतल्या होत्या.
  • एकूणच, या हंगामात त्याने आतापर्यंत केवळ 6 डावांमध्ये 24 विकेट्स घेऊन प्रभावी कामगिरी केली आहे.

The post Ranji Trophy 2025 : औकिब नबीचा रणजीत ‘कहर’! चार सामन्यात तिसऱ्यांदा ५ विकेट्स घेण्याचा केला पराक्रम appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!