
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी या वर्षात गुड न्यूज दिली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल आई-बाबा बनले, कतरिनाने मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं पॅरेंट्स क्लबमध्ये सामील झालं आहे. विख्यात अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही आता गुड न्यूज दिली आहे. ते दोघंही आई-बाबा बनले असून त्यांच्या घरी गोंडस बाळाचे आगमन झालं आहे. पत्रलेखा हिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून सर्वांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे.
आमच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी देवाने आम्हाला हे सर्वात सुंदर गिफ्ट, आशिर्वाद दिलेत.. असं म्हणत त्यांनी मुलीच्या जन्माची सुखद बातमी पोस्ट केली आहे. थोड्या वेळापूर्वीच शेअर करण्यात आलेल्या या बातमीवर चाहते आणि इतर सेलिब्रिटींचे मिळून हजारो लाईक्स आले असून त्यांच्यावर शुभेच्छा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
बातमी अपडेट होत आहे.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











