
प्रभात वृत्तसेवा
पुणे – सलग तिसऱ्या दिवशी शहरातील थंडीचा पारा खाली आला असून, गेल्या २४ तासांत दोन ते तीन अंशाने किमान तापमानात घट झाली आहे. परिणामी पहाटेच्या थंडीचा जोर वाढला असून, रात्रीही चांगलीच थंडी जाणवत आहे. शनिवारी (दि. ८) हवेली परिसरात सर्वात कमी १३.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.गेल्या तीन दिवसांपूर्वी २१ ते २३ अंशावरील किमान तापमान शनिवारी १३ अंशापर्यंत खाली आले.
म्हणजेच तीन दिवसांत किमान तापमानात सात ते आठ अंशाने घट झाली आहे. आज पहाटे धुके आणि थंडीचा अनुभव घेतल्यावर दुपारी बारानंतर शहरासह उपनगरात उन्हाचा चटकाही जाणवत होता. कमाल तापमानात फारसा बदल झाला नसला तरी उन्हाच्या चटक्यामुळे काहीशा उकाडा जाणवत होता. सायंकाळी पुन्हा थंडी जाणवू लागली. ऊन आणि थंडी असा हवामानामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत दोन ते तीन अंशाने किमान तापमान घसरले असून शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी (दि. ७) १७ अंशावर असलेले किमान तापमान शनिवारी १५ अंशापर्यंत खाली आले. हवेली परिसरात सर्वात कमी १३.५, जिल्ह्यातील माळीण येथे १३.६ तर तळेगांव दाभाडे परिसरात १४.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
पाषाण परिसरात १५.१, शिवाजीनगर येथे १५.९, लोहगांव येथे १८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून, आकाश निरभ्र राहील. किमान तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता आहे.
The post Pune Weather : अखेर पुण्यात थंडीची जोरदार एन्ट्री! किमान तापमान १३ अंशांवर, आणखी पारा घसरणार appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











