Pune news : घरगुती गॅस गळतीमुळे आग; एक ज्येष्ठ नागरिक जखमी

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पुणे : सातारा रस्त्यावरील ज्ञानेश्वर हाउसिंग सोसायटीमध्ये घरगुती गॅस गळतीमुळे आग लागल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेत बाबुराव दत्तात्रय महामुनी (वय ९९) हे ज्येष्ठ नागरिक जखमी झाले असून, नातेवाईकांच्या मदतीने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सदर सोसायटी सद्गुरू श्री शंकर महाराज मठासमोर, पुणे-सातारा रस्त्यावर आहे. सहाव्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये गॅस गळती सुरू असताना अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच कात्रज आणि गंगाधाम अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यात यश मिळवले. या आगीत घरातील स्वयंपाकघरातील साहित्य, इलेक्ट्रिक वायरिंग आणि भिंतींचा रंग यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आग विझविण्याच्या कार्यात कात्रज अग्निशमन केंद्राचे प्रभारी उपअग्निशमन अधिकारी संतोष भिलारे, फायरमन किरण पाटील, विनायक घागरे, योगेश कुंभार, अक्षय देवकर, शुभम बोबडे, चालक बंडू गोगावले, तसेच गंगाधाम अग्निशमन केंद्राचे फायरमन राजेश घडशी, शैलेश गोरे, अक्षय मोढे, ज्ञानेश्वर कदम, धनंजय भिसे, चालक प्रसाद शिंदे यांनी सहभाग घेतला.

The post Pune news : घरगुती गॅस गळतीमुळे आग; एक ज्येष्ठ नागरिक जखमी appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!