Pune News : मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश, अनियमितता आढळल्यास थेट कारवाई

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मुंढवा येथील शासनाच्या जमिनीची खरेदी-विक्री व्यवहाराच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. ही समिती या प्रकरणात अनियमितता झाली की नाही, तसेच झाल्यास काय अनियमितता झाली त्याची सखोल चौकशी करणार आहे. अनियमितता आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणे आणि कारवाईची शिफारस शासनाकडे करणे, अनियमितता सिद्ध झाल्यास, सदर जमीन तिच्या मूळ स्थितीवर आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविणे, तसेच भविष्यात अशी प्रकरणे घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना सुचविणार आहे.

मुंढवा येथील सर्वे नंबर ८८ मधील जमिनीच्या दस्ताच्या खरेदी-विक्री व्यवहार अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर याची सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यांनी समिती स्थापन केली आहे.

The post Pune News : मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश, अनियमितता आढळल्यास थेट कारवाई appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!