Pune News : वाघोलीत मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू सहकार्याच्या भेटीने खळबळ

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

वाघोली : वाघोली तालुका हवेली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तथा खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार श्रीकांत भारतीय यांनी सहकुटुंब भेट दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

खराडी, चंदननगर, वाघोली परिसरात सध्या वाघोली चे माजी उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे संचालक रामकृष्ण सातव पाटील हे सपत्नीक नागरिकांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. देवदर्शन यात्रांबरोबर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देखील त्यांनी घेतल्या आहेत. रामकृष्ण सातव पाटील भाजप कडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा सध्या रंगू लागली असतानाच आमदार श्रीकांत भारतीय यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वाघोली मध्ये रामकृष्ण सातव पाटील यांना मानणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने आगामी काळात रामकृष्ण सातव पाटील कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संचालन समिती स्थापन करण्यात आली असून यात भाजप कडून सहसंयोजक पदी नियुक्ती झाल्याने या भेटीची चर्चा मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

The post Pune News : वाघोलीत मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू सहकार्याच्या भेटीने खळबळ appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!