Pune news : वाळूखाली दबून ५ वर्षांच्या बालकाचा दुर्देवी मृत्यू; डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पुणे – डंपरमधून वाळू उतरवित असताना वाळूखाली दबून पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भाेर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडली. दुर्घटनेत बालकाची आई, तसेच त्याचा भाऊ, चुलत बहीण वाळूखाली दबले गेले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

अलोक अशोक कचरे (वय ५) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. या दुर्घटनेत त्याची आई आरती (वय ३५) भाऊ श्लोक (वय ६), चुलत बहीण प्रियंका (वय १५) हे जखमी झाले. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरे कुटुंबीय नसरापूर परिसरातील धनगर वस्ती येथे राहायला आहेत. कचरे कुटुंबीयांचे जुने घर आहे. हे घर पाडण्यात आले असून, नवीन घर बांधण्याचे काम सुरू आहे. नवीन घराचा पाया खोदून तेथे खांबही उभे करण्यात आले आहे. जवळच एका पत्र्याच्या शेडमध्ये कचरे कुटुंबीय राहायला आहे. शनिवारी (८ नोव्हेंबर) बांधकाम साहित्य पुरवठदाराकडून अशोक कचरे यांनी वाळू मागविली होती. दुपारी दीडच्या सुमारास धनगर वस्ती परिसरात वाळू घेऊन डंपर चालक तेथे आला.

बांधकामाच्या ठिकाणी डंपरमधून वाळू उतरविण्याचे काम करण्यात येत होते. त्यावेळी डंपरचालकाने कचरे कुटुंबीय राहत असलेल्या पत्र्याच्या शेडजवळ वाळू उतरविण्याच्या प्रयत्न केला. मात्र, डंपर चालकाच्या चुकीमुळे वाळू पत्र्याच्या शेडवर पडली. त्यावेळी शेडमध्ये अलोक, त्याची आई आरती, भाऊ श्लोक, प्रियंका होते.

अचानक वाळूचा शेडवर पडल्याने पत्रा फाटला. वाळूच्या ढिगाऱ्याखाली अलोक, त्याची आई आरती, भाऊ श्लोक, चुलत बहीण प्रियंका दबले गेले. रहिवाशांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेतली. वाळूच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या चौघांना नसरापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले.

वाळूच्या ढिगाऱ्यााखाली सापडल्याने त्यांच्या नाका तोंडात वाळू गेली होती. बेशुद्धावस्थेतील अलोक याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्याची आई, भाऊ, चुलत बहिणीव खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले, दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती राजगड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ओैदुंबर अडवळ यांनी दिली.

The post Pune news : वाळूखाली दबून ५ वर्षांच्या बालकाचा दुर्देवी मृत्यू; डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!