Pune news : खराडी बायपासवर भीषण अपघात; डंपरखाली चिरडून युवकाचा मृत्यू

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पुणे – खराडी बायपास परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विमाननगर येथील टाटा गार्डरूम बस स्टॉपसमोर ही घटना घडली. मृताचे नाव सचिन वसंत धुमाळ (वय २८, रा. मल्हारनगर, वडगाव शेरी, पुणे) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल भानुदास माने (वय २५, रा. सोमनाथनगर, पुणे) आणि त्याचा मित्र सचिन धुमाळ हे दोघे जण अॅक्टिवा (क्र. एम.एच. १२ पीएक्स ३२४४) या दुचाकीवरून विमाननगरहून खराडी बायपासकडे जात होते. मध्यरात्री सुमारास टाटा गार्डरूमजवळ पाठीमागून येणाऱ्या डंपर चालकाने जोरात हॉर्न वाजवल्याने सचिन घाबरला व गाडीवरील ताबा सुटला.

गाडी घसरल्यामुळे सचिन धुमाळ रस्त्याच्या डाव्या बाजूला पडला, तर स्वप्निल माने उजव्या बाजूस पडला. त्याचवेळी मागून आलेल्या डंपरखाली सचिन धुमाळ चिरडला गेला आणि गंभीर जखमी झाला. स्वप्निल मानेला हात आणि कंबरेवर मार लागला आहे.

अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी तत्काळ अॅम्ब्युलन्सला माहिती दिली. सचिनला ससून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणी स्वप्निल भानुदास माने यांनी डंपर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत झाल्याची फिर्याद विमानतळ पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास विमानतळ पोलिस करत आहेत.

The post Pune news : खराडी बायपासवर भीषण अपघात; डंपरखाली चिरडून युवकाचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!