Pune News : नशेत पेटवलेली सिगारेट जीवावर बेतली ; सोमवार पेठेतील हॉटेलच्या बंद खोलीत तरुणाचा गुदमरून मृत्यू

-dead-body
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सोमवार पेठेतील हाॅटेलमध्ये लागलेल्या आगीत एकाचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.मोहित भूपेंद्र शहा ( ३२, रा. दौंड. जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. शहा हा एका सनदी लेखापालाकडे कामास होता. त्याला दारूचे व्यसन असून त्याचा घटस्फोट झाला आहे. गुरुवारी रात्री शहाने खूप मद्यपान केल्याने मित्राने त्याला सोमवार पेठेतील एका हाॅटेलमध्ये झोपण्यास सांगितले. येथे एका खोलीत तो झोपला.

शुक्रवारी सकाळी त्याने खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने कामगारांना संशय आला. दुपारी बाराच्या सुमारास खोलीतून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. हाॅटेल कामगारांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन जवानांनी दरवाजा तोडला तेव्हा मोहित बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याचा पाय भाजला होता. त्याला तातडीने ससूनमद्ये दाखल केले.उपचारांपूर्वीच तो मरण पावल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, तेव्हा खोलीतील गादी जळाली होती. सिगारेटचे जळते थोटूक नशेतील शहाने गादीवर टाकल्याने आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने गुदमरुन त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलीस निरीक्षक गित्ते यांनी व्यक्त केली. शवविच्छेदनानंतर शहा याच्या मृत्यूचे निश्चित कारण समजेल.

The post Pune News : नशेत पेटवलेली सिगारेट जीवावर बेतली ; सोमवार पेठेतील हॉटेलच्या बंद खोलीत तरुणाचा गुदमरून मृत्यू appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!