
चाकण : आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पारदर्शक, शांततेत आणि शिस्तबद्धपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे आणि मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चाकण नगरपरिषद क्षेत्रात १२ प्रभागांतील एकूण २५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत १७ हजार २६२ पुरुष, १५ हजार ८६२ महिला आणि १ इतर असे एकूण ३३ हजार १२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी ३६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असून, मतदानाची तारीख २ डिसेंबर २०२५ निश्चित केली आहे.
निवडणूक तयारी
प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी, रॅम्प, शौचालय आणि विद्युत व्यवस्था करण्यात येणार असून, मतदारांना सुलभ वातावरण मिळावे यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या EVM आणि VVPAT मशीनची तपासणी आणि प्रात्यक्षिक चाचणी पूर्ण झाली आहे. मतदानाच्या अगोदर सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मशीनची चाचणी घेण्यात येईल. गैरप्रकार टाळण्यासाठी आचारसंहिता लागू होताच विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच, सोशल मीडियावरील प्रचार व अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र निरीक्षण पथक नेमण्यात आले आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ‘SVEEP जनजागृती मोहीम’ सुरू करण्यात आली आहे. वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी घरपोच मतदान सुविधा देण्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.
The post Pune district : चाकण नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











