
आळंदी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) आता आळंदी नगरपरिषद निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून उमेदवारी इच्छुकांच्या मुलाखती आज आळंदी शहर शिवसेना पक्ष कार्यालयात पार पडणार आहे. या मुलाखतीतून नगरपरिषदेतील नगराध्यक्षासह सर्व २१ प्रभागांतील संभाव्य उमेदवारांचा ताळमेळ घालण्यात येणार आहे.
दरम्यान, मुलाखत संपर्क प्रमुख आमदार शरद सोनवणे व शिवसेन उपनेते इरफान सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, तालुका प्रमुख निलेश पवार, शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, शहर संपर्कप्रमुख, महिला आघाडी व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्षातर्फे अर्ज दाखल केलेल्या सर्व इच्छुकांना या बैठकीस बोलावण्यात आले आहे.
स्थानिक पातळीवर या मुलाखतींविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, पक्षातील शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया पार पडणार आहे. शिवसेनेकडून आळंदीत “विकासासाठी वचनबद्ध शिवसेना” या घोषवाक्याखाली प्रचार मोहीम उभारण्याची तयारी सुरू आहे. वारकरी व्यवस्थापन, स्वच्छता, वाहतूक सुसूत्रीकरण, इंद्रायणी नदीघाटचा विकास, तसेच महिलांसाठी सुरक्षितता या प्रमुख मुद्द्यांवर आगामी प्रचार फोकस राहणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संघटन विस्ताराच्या मिशनवर आहे. त्याचाच भाग म्हणून आळंदी नगरपरिषद ही निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह, विकासाचे धोरण आणि शिंदे गटाची संघटनशक्ती यांच्या बळावर शिवसेना आळंदीत भक्कम पॅनल उभा करण्याच्या तयारीत आहे.
या मुलाखतीनंतर अंतिम उमेदवार यादी उच्चस्तरावर केली जाणार असून, लवकरच अधिकृत उमेदवारांची घोषणा अपेक्षित आहे. दरम्यान, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आळंदीत तिरंगी लढत रंगणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चेला जोर आला असल्याचे चित्र आळंदी शहरात आहे.
The post Pune District : आळंदी नगरपरिषदेसाठी शिवसेना सज्ज appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











