
पानशेत : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, खेड-शिवापूर – खानापूर गटामध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) इच्छुकांच्या यादीत माजी पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव यांच्या पत्नी, शिवानी अनिरुद्ध यादव यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याने या गटातील निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.
’मिशन २०२५’ च्या तयारीसाठी यादव कुटुंबीयांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनिरुद्ध यादव यांच्या २०१७ ते २०२२ या कार्यकाळातील अभूतपूर्व विकासात्मक कार्याची पावती म्हणून शिवानी यादव यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव यांच्या कार्यकाळात मतदारसंघात सुमारे ६० कोटी रुपये खर्चाची विकासकामे यशस्वीरित्या मार्गी लागली आहेत. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार भीमराव तापकीर यांच्या माध्यमातून हा सर्व निधी उपलब्ध झाला, ज्यामुळे अनिरुद्ध यादव यांनी मतदारसंघाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे.
दर्जेदार महामार्ग व रस्ते: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आर्वी, गाऊडदरा, कल्याण, सिंहगड आणि मोरदारी येथील महत्त्वाचे रस्ते उत्कृष्ट दर्जाचे पूर्ण करण्यात आले. वस्ती सुधारणांना प्राधान्य: घेरासिंहगड धनगरवस्ती व रामोशीवस्ती, तसेच कल्याण धनगरवस्ती येथील रस्त्यांसाठी आमदार तापकीर यांच्या प्रयत्नातून विशेष निधी आणण्यात येऊन कामे वेगाने सुरू झाली आहेत.
कडवी झुंज अटळ!
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे शिवगंगा खोरे तसेच शिवसेना यांमध्ये ही जागा मिळवण्यासाठी कडवी झुंज होण्याची शक्यता आहे. भाजपामध्ये शिवानी यादव यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातील विकासाचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी येणार हे निश्चित आहे. राजकीय कामासोबतच शिवगंगा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनिरुद्ध यादव यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने सुरू असतात. या गटात भाजपाकडून शिवानी यादव यांना उमेदवारी मिळाल्यास, राष्ट्रवादी आणि शिवसेना आपली रणनीती कशी बदलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे!
The post Pune District : खेड-शिवापूर-खानापूर गटात राजकीय धुमश्चक्री! appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











