
वाल्हे : पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठा नीरा – कोळविहीरे जिल्हा परिषद गट हा मागील (२०१७) प्रमाणेच नागरिकांचा मागासवर्ग महिला आरक्षित झाला आहे. सलग २५ वर्षे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा गट अपवादात्मक मागील काळात (२०१७) शिवसेनेने बाजी मारली होती. हा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी राष्ट्रवादी पुन्हा प्रयत्नशील झाली आहे. यातच, शिवसेना शिंदे गट, भाजप, शरद पवार गट, शिवसेना उबाठा, आप, मनसे असे सात व काही अपक्ष उमेदवार रिंगणात उतरतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२०१७ साली पुरंदर तालुक्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषदेच्या ४ गटांपैकी ३ ठिकाणी, तर पंचायत समितीच्या ८ पैकी ६ जागा जिंकून शिवसेनेने पुरंदर तालुक्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. तत्कालीन भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना या ठिकाणी धक्का बसला होता. त्यावेळच्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बंडाळी व गटबाजीचा फायदा शिवसेनेला व काही ठिकाणी काँग्रेसला झाला होता.
जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या नीरा -कोळविहीरे गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, माजी सभापती बापू भोर, प्रदेश सदस्य कांचन निगडे, सोमेश्वरचे संचालक दिलीप थोपटे, सलग तीन पंचवार्षिक जिल्हा परिषद सदस्य व विविध विभागाचे सभापती पद असणारे नीरेचे चव्हाण परिवारातील सदस्यांसारखी दिग्गज नेते असताना शिवसेनेने बाजी मारली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या शालिनी पवार विजयी झाल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या तेजश्री विराज काकडे यांचा पराभव केला होता. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला या गटात यावेळी तरी उमेदवारी देताना पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
इच्छुक महिला उमेदवारींची नावे चर्चेत
नीरा – कोळविहीरे जिल्हा परिषद गटात ओबीसी महिला आरक्षण आले आहे. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निरेच्या सरपंच तेजश्री विराज काकडे, निकिता योगेश ननवरे तर भाजपाकडून भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या पत्नी, वाल्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सम्राज्ञी सचिन लिंबाते, माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या सूनबाई सानिका अजिंक्य टेकवडे, सीमा संदीप धायगुडे, हेमा उमेश चव्हाण, राधाबाई माने, शिवसेनेकडून भारती अतुल म्हस्के, सुजाता वसंतराव दगडे, तेजश्वीनी गणेश गडदरे, ज्योती सागर भुजबळ हे संभाव्य उमेदवार आपले जातीचे दाखले मिळवून आपल्या पक्षांकडे उमेदवारीची मागणी करीत आहेत.
राष्ट्रवादी पुन्हा ताकद लावणार?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चव्हाण कुटुंबातील महिलांच्या दाखल्याची जिंकून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. तसेच उमेदवार सारीका सागर भुजबळ हे कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची यांची चाचपणी करीत आहेत. नीरा -कोळविहीरे जिल्हा परिषद गट हा मागील पंचवर्षीक निवडणुकीचा अपवाद वगळता पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तो पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्हा परिषद गटात मोठी ताकद लावणार असल्याची चर्चा या जिल्हा परिषद गटातील आहे.
The post Pune District : राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला कोणाकडे ? appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











