Pune Crime : गुंड निलेश घायवळ आता ‘ईडी’च्या रडारवर; गुन्हेगारीतून जमवलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीची होणार चौकशी

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून संगठित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख निलेश घायवळच्या आर्थिक व्यवहारांचा तपास अंमलबजावणी संचालनालयाला (ED) करण्याची शिफारस करण्यात आली आहे. घायवळविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याने गुन्हेगारीतून मोठी संपत्ती कमावल्याचा संशय आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीविरुद्ध एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये खंडणी, गुन्हेगारी कट, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, खुनाचा प्रयत्न आणि मालमत्ता बळकावण्यासाठी दुखापत करणे अशा गंभीर कलमांचा समावेश आहे.

तपासादरम्यान पोलिसांना घायवळच्या मोठ्या आर्थिक उलाढालीचे पुरावे मिळाले आहेत. त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी धाराशिव, अहमदनगर, बीड, सातारा आणि परिसरात विंड पॉवर प्रकल्पांशी संबंधित गैरव्यवहार, खंडणी आणि बेकायदेशीर व्यवहारांद्वारे कोट्यवधींची मालमत्ता जमविल्याचा संशय आहे. या संदर्भातील एफआयआर आणि पुरावे ईडीकडे पाठविण्यात आले असून, तपासादरम्यान मनी लॉन्ड्रिंगचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

The post Pune Crime : गुंड निलेश घायवळ आता ‘ईडी’च्या रडारवर; गुन्हेगारीतून जमवलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीची होणार चौकशी appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!