Pune : कोथरूड सेफ झोनमध्ये ; प्रभाग क्र. १०, ११, ३१ साठी उमेदवारांची फिल्डिंग सुरू

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

कोथरूड – येथील प्रभाग क्र. १०, ११ आणि ३१ मधील आरक्षण २०१७ नुसार पडल्यामुळे कोथरूड सेफ झोनमध्ये आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, सत्ताधारी पक्षातील इच्छुकांच्या वाढलेल्या संख्येमुळे माजी नगरसेवकांची धाकधुक वाढली आहे. आरक्षण मनासारखे पडले परंतू, आपल्याच पक्षातील इच्छुकांनी लावलेल्या फिल्डिंमध्ये स्वत:ची उमेदवारी टिकवून ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार हे निश्चित आहे.

प्रभाग क्र. १० बावधन-भुसारी काॅलनी मध्ये दोन सर्वसाधारण महिला, एक सर्वसाधारण पुरूष तर एक ओबीसी पुरूष असे आरक्षण पडले आहे. या प्रभागामध्ये चारही नगरसेवक भाजपचे आहेत. मात्र, यावेळी प्रभागरचनेमध्ये परमहंसनगर येथील महत्वाचा भाग काढून दुसऱ्या प्रभागाला जोडण्यात आला आहे. त्यामुळे २०१७ मध्ये या प्रभागातून उमेदवारी मिळालेल्या उमेदवाराला आहे त्याच प्रभागात संधी मिळणार का दुसऱ्या प्रभागात संधी देणार. तसेच, मित्र पक्षासह विरोधी पक्षातील काही इच्छुक उमेदवारांसाठी आरक्षण फायद्याचे ठरत असून, अंतीम उमेदवारी झाल्यावर कोण कोणासमोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्र. ११ रामबाग काॅलनी-शिवतिर्थनगर मध्येही दोन सर्वसाधारण महिला, एक सर्वसाधारण पुरूष तर एक ओबीसी पुरूष असे आरक्षण पडले आहे. या प्रभागात काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचे वर्चस्व आहे. मागच्यावेळी या प्रभागात भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. आता भाजपकडून चारही जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, एक उमेदवार मित्र पक्षातील आणि दुसरे उमेदवार काँग्रेसचे असून, दोघांचेही प्रभागात मोठे प्राबल्य आहे.

प्रभाग क्र. ३१ मयूर काॅलनी-कोथरूड म्हणजे केंद्रीय राज्यमंत्र्यांचा प्रभाग, त्या जोडीला उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांची खंबीर साथ यामुळे या प्रभागाकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागलेले असते. याठिकाणी दोन सर्वसाधारण महिला, एक सर्वसाधारण पुरूष तर एक ओबीसी पुरूष असे आरक्षण पडले. सध्या या प्रभागात भाजपचे वर्चस्व असून, तीन भाजप आणि एक शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत.

आरक्षण नेहमीप्रमाणे असले तरी मुरलीधर मोहोळ यांच्या जागेवर उमेदवारी कोणाला मिळणार, त्याच्याबरोबर पुरूष गटातून दुसरा उमेदवार कोण ? पक्षातील असेल की बाहेरून आलेला ? तसेच विरोधकाचेही या प्रभागात प्राबल्य असल्यामुळे कोण कोणासमोर येणार याचीही चाचपणी होणार हे निश्चित.

The post Pune : कोथरूड सेफ झोनमध्ये ; प्रभाग क्र. १०, ११, ३१ साठी उमेदवारांची फिल्डिंग सुरू appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!