Pune : थंडीचा पारा जैसे थे

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now


पुणे –
शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासात किमान तापमानात फारसा बदल न झाल्यामुळे थंडीचा जोर कायम आहे. पाषाण परिसरात सर्वात कमी १३.१ तर शिवाजीनगर येथे १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, हवामान कोरडे राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

मागील चार ते पाच दिवसांपासून शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा जोर वाढलेला आहे. उपनगरातील काही भागात धुक्यांची चादर पसरल्याचा अनुभव पुणेकर घेत असून, सकाळी अकरापर्यंत हवेत गारवा जाणवत आहे.

त्यानंतर उन्हाचा हलका चटका थंडीवर फुंकर घालत असून, सायंकाळी पुन्हा थंडीने स्वेटर, कानटोप्या बाहेर निघतात. उपनगरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही आज काही अंशी घट झाली. शिवाजीनगर येथे ३० तर चिंचवड परिसरात २९.४ अंश सेल्सअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी वाढलेला उन्हाचा चटका कमी झाला.

The post Pune : थंडीचा पारा जैसे थे appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!