Pune : पीसीएम, पीसीबी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

एप्रिल व मे या दोन टप्‍प्‍यांत होणार सीईटी
– उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची मान्यता
पुणे –
अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एमएचटी-सीईटी आणि एमबीए अभ्यासक्रमाची सीईटी आता जेईई मेनच्‍या धर्तीवर वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार आहे. येत्‍या शैक्षणिक वर्षापासून पहिली प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी एप्रिल महिन्‍यात, तर दुसरी सीईटी मे महिन्यात होणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीईटी परीक्षेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या दोन प्रवेश परीक्षा होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी महाराष्ट्रातील मुलांनाही या दोन प्रवेश परीक्षांमधून मिळणार आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून,

दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्या, तर त्याला दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील, ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील. येत्‍या शैक्षणिक वर्षापासून दोन वेळा होणाऱ्या सीईटीचे सविस्‍तर वेळापत्रक राज्‍य सीईटी सेलतर्फे लवकरच जाहीर केले जाणार आहे.

The post Pune : पीसीएम, पीसीबी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!