
पक्षफुटीने अनेकांच्या नगरसेवक होण्याच्या इच्छेला अंकुर
पुणे – गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महापालिका निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांच्या स्वप्नांचा चुराडा महापालिकेच्या प्रभाग रचनेनंतर झाला होता. मात्र, आरक्षण सोडतीने माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुकांना अपेक्षित आरक्षण पडल्याने अनेकांच्या नगरसेवक होण्याच्या स्वप्नांना अंकुर फुटला आहे. त्यात प्रामुख्याने पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत होती. मात्र, आता आरक्षण सोडतीने पक्षफुटी आजी- माजी नगरसेवकांसह निवडणुकीची तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पथ्यावर पडली आहे.
दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी
राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्याने पुण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीला संधी मिळाली आहे. त्यातच भाजपडून स्वबळाचा नारा देण्यात आला असल्याने भाजप या निवडणुकीत केवळ शिवसेनेला सोबत घेण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) स्वबळावर लढणार आहे. परिणामी, इच्छुकांना, तसेच तिकीट न मिळाल्यास माजी नगरसेवकांना इतर राष्ट्रवादीत मोठी संधी असणार आहे.
शहरात भाजपचे ९८, तर राष्ट्रवादी ४२ नगरसेवक होते. त्यातील सुमारे ३८ माजी नगरसेवक अजित पवारांच्या सोबत आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे पर्याय इच्छुकांना उपलब्ध आहेत, तर भाजपकडे तिकिटासाठी रस्सीखेच असली, तरी भाजप जागा वाटपात शिवसेनेला केवळ २० ते २५ जागा देऊ शकते. त्यामुळे भाजपकडे जवळपास नवीन इच्छुकांसाठी १३५ ते १४० जागा असणार आहेत. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अनेक भागांत राष्ट्रवादी आणि भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे अशा प्रभागात हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार असल्याने या १२ ते १५ प्रभागांत दोन्ही पक्षांच्या इच्छुकांना नवीन जागा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय माजी नगरसेवकांच्या जागाही सुरक्षित राहणार आहेत.
कसबा, कोथरूड, खडकवासला, हडपसर सर्वाधिक सुरक्षित
आरक्षणाच्या सोडतीनंतर कसबा, कोथरूड, खडकवासला या तीन विधानसभा मतदारसंघांत आरक्षणात विशेष बदल झालेले नाहीत. या तीन मतदारसंघांत कसबा मतदारसंघातील प्रभाग २४ मधील एससीचे आरक्षण कमी झाले आहे, तर कोथरूड व खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीचा समावेश असलेल्या वारजे- पाॅप्युलरनगर मतदारसंघात एससी (महिला) आरक्षण नव्याने पडले आहे. त्याव्यतिरिक्त या तीनही मतदारसंघांतील प्रभाग या ठिकाणी असलेल्या माजी नगरसेवकांसाठी अनुकूल ठरले आहेत.
The post pune : प्रभाग रचनेत गमावले, आरक्षणात कमावले appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











