Pune : महायुतीशी छुपी युती नाही;शरद पवार गटाची भूमिका

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पुणे : शहरात महायुतीविरोधात लढाई लढली असून, आता महायुतीसोबत छुपी युती होणार नसल्याची ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने घेतली आहे. आमची आघाडी महाविकास आघाडीसोबतच होणार असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची राज्यभर राजकीय चर्चा आहे. त्यामुळे, पवार गटाचे इच्छुकही संभ्रमात असून त्यांच्याकडून पक्षाकडे विचारणा केली जात आहे. त्यामुळे पक्षाने हा खुलासा केला आहे.

जगताप म्हणाले, महायुतीच्या काळात शहराची वाताहात झाली आहे. आम्ही गेल्या वेळी महायुतीविरोधात लढलो असून, आमची विचारधारा कायम आहे. महायुतीच्या कुठल्याच पक्षासोबत युती करण्याचा आमचा विचार नाही. आम्ही अधिकृत निर्णय घेणार नसून, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेणार आहेत.

मनसेला सोबत घेण्यासंदर्भात राज्य पातळीवर निर्णय होणार असून, तो शरद पवार घेतील. महापालिकेतील भ्रष्टाचार पुणेकरांनी अनुभवला आहे. त्यामुळे आता शहरात परिवर्तन घडविण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) सज्ज आहे, असेही जगताप यांनी सांगितले.

या संदर्भात पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले, कोल्हापूरमध्ये फक्त चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये युती झाली आहे; मात्र पुण्यात अशा चर्चेला आमच्या कार्यकर्त्यांमध्ये अजिबात वाव नाही. पुण्यात सर्व प्रभागांत सक्षम उमेदवार उभे राहतील. आमच्याकडे लवकरच काही इनकमिंग होणार असल्याचेही काकडे यांनी स्पष्ट केले.

The post Pune : महायुतीशी छुपी युती नाही;शरद पवार गटाची भूमिका appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!