
पुणे – हडपसर येथील शेवाळेवाडी चौकामध्ये आज सकाळी सुमारे ९.२० वाजता पेट्रोल आणि डिझेल भरलेल्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.
अग्निशमन नियंत्रण कक्षात आग लागल्याची वर्दी मिळताच हडपसर, काळेपडळ, बी.टी. कवडे रोड आणि खराडी अग्निशमन केंद्रांची वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचताच टँकरच्या केबिनला आग लागलेली दिसली. टँकरमध्ये पेट्रोल व डिझेल असल्याने मोठा स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला होता.
The post Pune : पेट्रोल व डिझेल टँकरला आग; अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखून टाळली मोठी दुर्घटना appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











