पुण्यात ‘इंस्टा गँग’चा धुमाकूळ; दिवाळीत बंद घरांची रेकी करून ८ घरफोड्या उघड

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

पुणे : इंस्टाग्रामवर झालेली ओळख, त्यातून वाढलेली मैत्री आणि नशेच्या आहारी गेलेले तरुण यांच्यापासून तयार झाली एक “इंस्टा गँग”! या टोळीने दिवाळीच्या काळात बंद घरांची रेकी करून तब्बल ८ घरफोड्या केल्या. या टोळीत एक विधीसंघर्षित बालकही असून त्याच्यावर तब्बल नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने या सराईत टोळीचा पर्दाफाश करत तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीचा प्रमुख नवनाथ उर्फ लखन बाळू मोहिते (२२, वैदुवाडी, हडपसर) असून त्याच्यावर अंमली पदार्थ बाळगण्याचा आणि विक्रीचा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्याच्यासोबत शिवम दत्ता अवचर (१९, नऱ्हे, अभिनव कॉलेज शेजारी) आणि एक विधीसंघर्षित बालक गुन्ह्यात सामील होते. हे तिघेही इंस्टाग्रामवर एकमेकांना भेटले. मैत्री वाढली आणि नशेच्या खर्चासाठी घरफोडीचा मार्ग त्यांनी स्वीकारला. पोलिसांनी सांगितले की, हे आरोपी गुन्हा करताना मोबाईलचा वापर टाळत असल्याने त्यांचा माग काढणे कठीण झाले होते.

दरम्यान २९ ऑक्टोबर रोजी एका घरात झालेल्या मोठ्या घरफोडीच्या तपासादरम्यान पोलिसांनी २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला. पोलीस शिपाई योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु कणे आणि हरीप्रसाद पुंडे यांच्या मेहनतीतून आरोपींचा माग काढण्यात आला. सापळा रचून तिघांना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.

चौकशीत त्यांनी दिवाळीच्या काळात बंद घरे फोडून आणि दुकाने उचकटून केलेल्या आणखी ७ घरफोड्यांची कबुली दिली. या प्रकरणांतून अतिरिक्त २ लाख ६ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. दरम्यान, त्यांनी चोरीतील सुमारे आठ ते नऊ तोळे सोने एका सराफाला विकले असल्याचे उघड झाले. त्या सराफालाही पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ४ तोळे सोने जप्त केले.

ही कारवाई उप आयुक्त सोमय मुंडे, सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक शरद शेळके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, नितीन राठोड तसेच कर्मचारी योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु कणे, हरीप्रसाद पुंडे, रुपेश पिसाळ, गणेश इथापे, दादासाहेब बर्डे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे, सागर कासार, पांडुरंग म्हस्के, अंबादास चव्हाण आणि राहुल जोशी यांच्या पथकाने केली.

इंन्टग्रामसारख्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात गुन्हेगार आणि त्यांच्या समर्थकांची खाती आहेत. यातून ते एकमेकांचे समर्थक करतात किंवा एकत्र येऊन गुन्हेगारी कट रचतात. हे प्रकार लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी गुन्हेगारी सोशल मिडियावर कडक वॉच ठेवला आहे. या अगोदरही सोशय मिडियावर रिल टाकणाऱ्या आणि त्यांना समर्थन करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

The post पुण्यात ‘इंस्टा गँग’चा धुमाकूळ; दिवाळीत बंद घरांची रेकी करून ८ घरफोड्या उघड appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!