जुलैपासून डिजिटल फसवणूक वाढली; बॅंकांकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मुंबई  – चालू वर्षाच्या जुलै महिन्यापासून डिजिटल फसवणुकीचे प्रकार वाढले असल्याचे रिझर्व बँकेच्या ध्यानात आले आहे. जुलै नंतर ते का वाढले याची शहानिशा करण्यात येत असून यावर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर यांनी सांगितले.

स्टेट बँकेने बँकिंग विषयावर आयोजित केलेल्या परिषदेत बोलताना शंकर यांनी सांगितले की, जुलै महिन्यापर्यंत डिजिटल फसवणुकीचे प्रकार तुलनेने कमी होते. नंतर ते का वाढले याबाबत आम्ही बँका आणि वित्तीय संस्थांबरोबर चर्चा करीत असून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मात्र डिजिटल फसवणूक जुलैपूर्वी किती होती आणि नंतर त्यात किती वाढ झाली याची आकडेवारी शंकर यांनी दिली नाही. ते म्हणाले की, फसवणुकीनंतर ग्राहकाचे पैसे ज्या बँकेत जातात तिथून पैसे परत मिळविण्यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्याच्या शक्यतेवर रिझर्व बँक वित्तीय तंत्रज्ञान कंपन्यांबरोबर चर्चा करीत आहे.

एका दुसर्‍या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2025 मध्ये 23,953 फसवणुकीचे प्रकार घडले. त्या अगोदरच्या वर्षात 36 हजार फसवणुकीचे प्रकार घडले होते. म्हणजे वार्षिक पातळीवर फसवणुकीचे प्रकार कमी झाले आहेत. मात्र जुलैनंतर त्यामध्ये वाढ होत असल्याचे सांगितले जाते. सरकारी बँकासंदर्भातील फ्रॉडची संख्या खासगी बँकापेक्षा कमी असली तरी सरकारी बँकात झालेल्या फसवणुकीमुळे जास्त रक्कम चोरली गेली आहे. फसवणूक प्रमाणात खासगी बँकातील फसवणुकीची संख्या एकूण संख्येच्या 45 % इतकी आहे.

बँकांची माहिती तंत्रज्ञान प्रणाली तुलनेने सारखीच असते. त्यामुळे फसवणूक करणार्‍यांना या प्रणालीत घुसखोरी करणे सोपे असते. त्यातून काही मार्ग काढता येईल का या शक्यतेवरही विचार करण्यात येत आहे. या प्रणालीत फरक असल्यानंतर ग्राहकांना व्यवहार करताना अडथळे येऊ शकतात, हा प्रश्न आहे.

The post जुलैपासून डिजिटल फसवणूक वाढली; बॅंकांकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!