
ओझर : अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे आज (दि. ८) संकष्टी चतुर्थी निमित्त लाखो भाविकांनी विघ्नहराच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे विश्वस्त संतोष कवडे, सुर्यकांत रवळे, प्रकाश मांडे, गोविंद कवडे, विनायक मांडे, विनायक जाधव, समीर मांडे यांच्या शुभहस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली.
महाआरतीचा मान श्री द्वारकानाथ भगत, सुभाष चव्हाण, आशितोष बोळीज, सुशील देशमुख, तुषार डुकरे यांना मिळाला. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब कवडे यांनी त्यांचे आभार मानले. पहाटे पाच ते अकरा वाजे पर्यंत रांगेत सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.३० वा. व दुपारी १२.०० वाजता मध्यान्ह आरती करण्यात आली.
सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी १०.३० वा.’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने विघ्नहर मंदिरात फुलांची आरस विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख करण्यात आला होता.
तसेच सोन्याचे अलंकार श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग, पिण्याचे पाणी, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था, दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर उद्यान, चप्पल स्टॅन्ड पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.
सायंकाळी ७.०० वा. नियमित हरिपाठ करण्यात आले. व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प.विशाल महाराज फलके, आमुंडी यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ शिरोली यांनी दिली. आजचे अन्नदाते संभाजी दत्तात्रय बोडके, ओझर यांनी चतुर्थीचे वारकरी अन्नदान केले. रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले.
आजच्या महाआरतीच्या मानकरी यांनी विकास कामात सहभागी होवून ट्रस्ट ला देणगी दिली. अरविंद सुदाम येधे यांनी दोन तोळे सोन्याचा हार अर्पण केला. तसेच महेंद्र रमेश कवडे १ लाख २१ हजार १२१, द्वारकानाथ भगत व विलास घंगाळे यांनी प्रत्येकी २१ हजार रु विकास कामासाठी देणगी दिली.
भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त, प्रकाश मांडे, सुर्यकांत रवळे, गोविंद कवडे, विक्रम कवडे, समिर मांडे, विनायक मांडे, संतोष कवडे, विलास कवडे, विनायक जाधव, मंगेश पोखरकर, शिल्पा जगदाळे, यांनी केले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.
The post विघ्नहराच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी.. appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











