राष्ट्रवादी पक्षाने पाठवली नोटीस, रुपाली पाटील – ठोंबरे काय म्हणाल्या ?

राष्ट्रवादी पक्षाने पाठवली नोटीस, रुपाली पाटील – ठोंबरे काय म्हणाल्या ?
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात गेले काही दिवस खंडाजंगी सुरु आहे.त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातल्या दोन नेत्यांमधील या वादाने सर्वत्र चर्चेला तोंड फुटले आहे. आता या प्रकरणात रुपाली पाटील-ठोंबरे यांना पक्षाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसीवर आता रुपाली पाटील – ठोंबरे यांनी उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात कलुगीतुरा लागला आहे. या संदर्भात रुपाली पाटील -ठोंबरे यांना राष्ट्रवादी पक्षाने नोटीस पाठवली आहे. याबद्दल रुपाली पाटील -ठोंबरे यांना विचारले असता. रुपाली पाटील-टोंबरे यांनी सांगितले की मला पक्षाची नोटीस आलेली नाही, मला पक्षाने खुलासापत्र काल रात्री दिलं आहे. मी माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला मागितला आहे. 7 दिवसांचा त्यासाठी वेळ मला दिलेला आहे.तो खुलासा मी देणार आहे असेही रुपाली पाटील – ठोंबरे यांनी सांगितले.

पक्षातील खुलासा ही एक प्रक्रिया आहे. जे सत्य आहे ते मी सगळं सांगणार आहे. कायदेशीर खुलासा जेव्हा मी पक्षाला करेल तेव्हा तो मी तुम्हाला सुद्धा देणार आहे. माधवी खंडाळकर नावाच्या महिलेने व्हिडीओ व्हायरल केला होता.तिला मारलं असे तिने सांगितले होते, तेव्हा मी बीडमध्ये होते असे रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटले आहे. माधवी खंडाळकर यांच्या व्हिडीओचा वाद त्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये गेला. तो वाद संपवण्यात आला होता. त्यानंतर सीपीला त्या माधवी खंडाळकर हीने तक्रार दिली. त्याच्या अर्ध्या तासात गुन्हा घेतला गेला. माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर 354 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

खंडाळकर यांचा गुन्हा कुणाच्या सांगण्यावरुन

माधवी खंडाळकर या अजित पवार यांना भेटायला आल्या. माधवी खंडाळकर यांचा गुन्हा कुणाच्या सांगण्यावरुन दाखल करण्यात आला, याचा तपास व्हावा. यासाठी मी सीपीला अर्ज दिला आहे असे रुपाली पाटील -ठोंबरे यांनी म्हटले आहे. डॉ. संपदा मुंडे प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चारित्र्यहनन करतात आणि ती पोस्ट डिलिट करतात. ती पोस्ट माझ्याकडे आहे. (ती पोस्ट वाचून दाखवली) याआधी सुद्धा, 20 जून 2024 सालची पोस्ट स्क्रिनशॉट पाहा. तेव्हा सुद्धा एका महिलेला उभे करुन माझ्याविरोधात चाकणकर मॅडमने पोस्ट केली होती. मी ही पोस्ट सुनील तटकरे, आदिती तटकरे यांना पाठवली आहे असेही रुपाली पाटील -ठोंबरे यांनी सांगितले.

आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देणार आहे. माधवी खंडाळकर यांनी व्हीडिओ व्हायरल केला होता तो ऐका.त्यात रुपाली चाकणकरांना फोन कर, असा उल्लेख आहे. चाकणकर यांच्याशी आपला संबंध नाही म्हणणारी महिला, त्याच व्हीडिओत चाकणकरांचा उल्लेख करत आहे. मी काय तिच्या घरात कॅमेरे लावलेले नाहीत असेही  रुपाली पाटील -ठोंबरे म्हणाल्या.

पालकमंत्री म्हणून दादांना सांगितलं

अजितदादांना सांगितलं आहे,  त्यांना कुणी पाठवलं आणि फोनवर कुणाशी बोलत होत्या, त्याचा सीडीआर काढायला मी सांगितलं आहे. पालकमंत्री म्हणून दादांना सांगितलं आहे, की याचा पूर्ण अहवाल आहे. कोण चुकलेला आहे त्याचा अहवाल पोलीस दादांसमोर ठेवतील. राज्य महिला आयोग सैंविधानिक पद, पक्षाचा विभाग नाही असेही रुपाली पाटील ठोंबरे यावेळी म्हणाल्या.

मी काय पळून जाणारी महिला वाटते काय?

दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. दादांना सांगितलं लहानपणापासून आम्ही मैत्रिणी आहोत हे ऐकून दादा शॉक झाले. दादा म्हणाले ज्यांची चूक आहे त्याची पोलीस तपासातून माहिती मागून घेणार आहेत. यावेळी पक्षाचा राजीनामा देणार का ? असे विचारले असता मी काय पळून जाणारी महिला वाटते काय तुम्हाला?  कायद्याने उत्तर देणार आहे असे उत्तर रुपाली पाटील-टोंबरे यांनी दिले.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!