
हिंदी चित्रपटसृष्टीने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटींना गमावलं आहे. दरम्याव या दोन दिवसात आणखी दोन सेलिब्रिटीचे निधन झाले आहे.
1970 आणि 1980 च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि आवाजाने मनावर राज्य करणाऱ्या सुलक्षणा पंडित यांचे काल वयाच्या 71 व्या वर्षी कार्डियाक अरेस्टच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपट निर्माते संजय खान यांच्या पत्नी जरीन कतरक यांचेही कार्डियाक अरेस्टच्या झटक्याने निधन झाले. या धोकादायक आजाराने दोन दिवसांत दोन सेलिब्रिटींचा बळी घेतला आहे.
या सेलिब्रिटींचे कार्डियाक अरेस्टच्या झटक्याने निधन
जरी या सेलिब्रिटींचे निधन हे कार्डियाक अरेस्टच्या झटक्याने झाले असले तरी हा अटॅक फक्त 60 किंवा 70 व्या वयातच येतो असं नाही . तर कोणत्याही वयात हा अटॅक येऊ शकतो. भारतात 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचा मृत्यूही कार्डियाक अरेस्टमुळे होऊ शकतो. पण हा कार्डियाक अरेस्टचा झटका आणि हृदयविकाराचा झटका यात काही फरत असतो का? कार्डियाक अरेस्ट किती धोकायक आहे? त्याची कारणे आणि लक्षणे काय असतात हे जाणून घेऊयात.
कारण अलिकडच्या दिवसांमध्ये भारतात हृदयविकाराचे झटक्यांमुळे मृत्यू होत असल्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. विशेषतः कोविड-19 साथीच्या आजारानंतर हृदयविकाराचा झटका, कार्डियक अरेस्टने अनेकांचे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कार्डियाक अरेस्टबद्दल थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट यात काय फरक आहे?
अमेरिकेतील ओहियो येथील वैद्यकीय केंद्र असलेल्या क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, कार्डियाक अरेस्ट ही एक इलेक्ट्रिकल समस्या आहे ज्यामुळे तुमचे हृदय धडधडणे बंद होते. दुसरीकडे, हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा रोखला जातो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, कार्डियाक अरेस्ट ही एक इलेक्ट्रिकल समस्या आहे, तर हृदयविकाराचा झटका ही ब्लड सर्क्यूलेशनशी संबंधित समस्या आहे.
कार्डियाक अरेस्टमध्ये काय होते?
कार्डियाक अरेस्टमध्ये, हृदयाचे ठोके थांबतात आणि जेव्हा हृदय रक्त पंप करू शकत नाही, तेव्हा व्यक्ती बेशुद्ध होते. कार्डियाक अरेस्ट काही मिनिटांतच प्राणघातक ठरू शकतो. म्हणून जेव्हा कधी अशी परिस्थिती असल्याचं लक्षात आली तर तेव्हा ताबडतोब जी मदत असेल ती घ्यावी, आजूबाजूच्या लोकांना तातडीने मदतीसाठी बोलवावे. तसेच एखाद्या व्यक्तीला जर हा त्रास सुरु झाला तर लगेच सीपीआर सुरू करावा. जर एखाद्या व्यक्तीला त्वरित मदत मिळाली तर त्याच्या जगण्याची शक्यता असते.
शरीराच्या अवयवांना सतत ऑक्सिजनची आवश्यकता असते. तुमचे रक्त तो ऑक्सिजन पोहोचवते.कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय रक्त पंप करू शकत नाही आणि काही मिनिटांतच तुमचे अवयव आणि संपूर्ण शरीर थंड पडेत. शरीराची हालचाल थांबू शकते आणि त्यावेळी व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.
कार्डियाक अरेस्टच्यावेळी लोक सामान्यतः बेशुद्ध होतात आणि प्रतिसाद देत नाहीत, म्हणून त्याला सडन कार्डियक अरेस्ट असेही म्हणतात. जर तुम्हाला त्वरित उपचार मिळाले नाहीत तर ही स्थिती घातक ठरू शकते.
कार्डियाक अरेस्टच्या झटक्यांची कारणे काय आहेत?
इलेक्ट्रिल सिस्टममध्ये जर गडबड झाली तर हृदयविकाराचा झटका येतो, परंतु हृदयाच्या अनेक आजारांना ते जबाबदार असू शकते. यातीस सर्वात जीवघेणा आजार म्हणजे वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन. या आजारासाठी इतर अनेक आजार देखील जबाबदार असतात. जसं की कार्डिओमायोपॅथी, विविध औषधे घेत राहणे,हार्ट फेलियर, कोकीन, ब्रुगाडा सिंड्रोम, लॉन्ग क्यूटी सिंड्रोम असे अनेक कारणे असू शकतात.
कार्डियक अरेस्टची लक्षणे
बेशुद्ध पडणे, हृदयाचे ठोके जलद होणे,चक्कर येणे,अशक्तपणा ही लक्षणे दिसून येतात. पण काही केसेसमध्ये ही लक्षणे नसतानाही कार्डियक अरेस्टचा झटका अचानक येऊ शकतो.
कार्डियक अरेस्टचा झटका येण्याआधी नेमकं काय होतं?
बेशुद्ध होण्यापूर्वी तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यांची लक्षणे जाणवू शकतात. जसं की छातीत दुखणे, मळमळ आणि उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी.
रुग्णाचा जीव कसा वाचवायचा?
ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे जिथे सीपीआर आणि डिफिब्रिलेशन म्हणजे इलेक्ट्रिक शॉक देणारी मशीन सारख्या उपचारांची आवश्यकता असू शकते. सीपीआर तुमच्या फुफ्फुसांमध्ये पुरेसा ऑक्सिजन भरतो आणि इलेक्ट्रिक शॉकमुळे तुमचे हृदयाची गती पूर्ववत होण्यास मदत होते. सीपीआर आणि डिफिब्रिलेटर रुग्णाचे प्राण वाचवू शकतात.
महत्त्वाची टीप: पण त्याआधी थोडीफार काही लक्षणे जाणवत असतील तर अजिबात दुर्लक्ष न करता किंवा वेळ न घालवता थेट डॉक्टरांना फोन करून बोलावून घ्या किंवा जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर रुग्णालयात पोहोचण्याचा प्रयत्न करा. तसेच तुमच्या आजुबाजूच्या लोकांची यासाठी मदत घ्या.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











