“सीनचा डेमो दाखविताना…”; संघर्षाच्या काळात घडली धक्कादायक घटना; मौनी रॅायने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Mouni Roy : बॅालिवूडमध्ये प्रसिद्धी मिळण्याअगोदर कलाकारांना मोठा संघर्षाचा सामाना करावा लागतो. खरंतर ही इंडस्ट्री ग्लॅमर निर्माण करत असली असे वाटत असले तरी तितकीच भयानक काळी बाजू इंडस्ट्रीची आहे, हेही नाकारून चालणार नाही. अनेक कलाकारांच्या वाट्याला आलेल्या भयानक अनुभवातून ही बाजू समोर आलेली आहे. तसे थक्क करणारे धक्कादायक अनुभव कलाकारांनी शेअर केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री मोनी रॅाय हिने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

‘नागिन’ आणि ‘देवों के देव महादेव’ या सारख्या सुपरहिट मालिकांनी मोनी रॅायला प्रसिद्धी मिळवून दिली. नंतर ती रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातही झळकली. जिथे तिची नकारात्मक पण प्रभावी भूमिकेला प्रक्षेकांची पसंती मिळाली. आता मौनी लवकरच डेविड धवन दिग्दर्शित रोमँटिक कॉमेडी ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात दिसणार आहे. पण या यशाच्या मागे संघर्ष आणि काही कटू आठवणीमधील एक धक्कादायक अनुभव तिने मुखिजा यांच्या ‘स्पाइस इट अप’ या शोमध्ये सांगितला.

ज्यावेळी अभिनेत्रीसोबत धक्कादायक घटना घडली, त्यावेळी तिचे वय अवघे २१ ते २२ वर्ष होते. एका ऑफिसमध्ये नरेशनसाठी गेले होते. एका सीनमध्ये दाखवलं होतं की, एक मुलगी स्विमिंग पूलमध्ये पडते आणि बेशुद्ध होते. त्यानंतर हिरो तिचे प्राण वाचवण्यासाठी माउथ टू माउथ सीपीआर देतो. या सीनचा डेमो दाखविताना समोरच्या व्यक्तीने चेहऱ्यावर हात ठेवत प्रत्यक्षात माउथ टू माउथ दाखवण्याचा प्रयत्न केला, असे मौनी रॅायने सांगितले. या सगळ्यामुळे ती घाबरली नेमकं काही कळायच्या आतच हे सगळं घडले. त्यानंतर ती तिथून पळून गेली.

हेही वाचा : संसदेचे हिवाळी अधिवेशन ‘या’ दिवसापासून होणार सुरू; मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा

The post “सीनचा डेमो दाखविताना…”; संघर्षाच्या काळात घडली धक्कादायक घटना; मौनी रॅायने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!