दोन महिलांसह तीन माओवादी ठार ! सुकमामध्ये सुरक्षा दलांसोबत चकमक

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Sukma – बस्तर झोनमधील सात माओवाद प्रभावित जिल्ह्यांपैकी सुकमा हे दक्षिण छत्तीसगडमधील डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी गटाचे केंद्रस्थान म्हणून ओळखले जाते. त्याच सुकमा जिल्ह्यातील तुमलपाडच्या डोंगराळ जंगली भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सीपीआय (माओवादी) चे किमान तीन कार्यकर्ते ठार झाले. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

तुमलपाड जंगलात माओवादी असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव रक्षकांच्या (डीआरजी) पथकाने शोध मोहीम सुरू केली. या भागात गोळीबार सुरू झाला आणि सकाळपासून जंगलात अधूनमधून चकमकी सुरू होत्या. चकमकीच्या ठिकाणाहून आतापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती सुकमा जिल्हा पोलिस प्रमुख किरण चव्हाण यांनी दिली.

मृत माओवाद्यांची ओळख पटली आहे. जन-मिलिशिया कमांडर माडवी देवा, कोंटा एरिया सीएनएम कमांडर पोडियम गांगी आणि किस्तारामचा एरिया कमिटी सदस्य सोडी गांगी अशी त्यांची नावे आहेत. प्रत्येकाविरोधात ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. घटनास्थळावरून सैन्याने एक. ३०३ रायफल, बॅरल ग्रेनेड लाँचर (बीजीएल) लाँचर, इतर शस्त्रे आणि दारूगोळा देखील जप्त केला. २०२५ मध्ये आतापर्यंत बस्तर रेंजमध्ये केंद्रीय समिती सदस्य, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य आणि पीपल्स लिबरेशन गेरिला आर्मी कार्यकर्त्यांसह एकूण २३३ माओवादी मारले गेले आहेत.

The post दोन महिलांसह तीन माओवादी ठार ! सुकमामध्ये सुरक्षा दलांसोबत चकमक appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!