
Tere Ishk Mein Trailer : धनुष आणि क्रिती सॅनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘तेरे इश्क में’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची बरीच चर्चा सुरू होती. अखेर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या वर्षात सैय्यारा चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घातला. एका विक्रमी आकड्याची कमाई केली चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर केली. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित होता. तेरे इश्क में चित्रपटही प्रेमकथेवर आधारित आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात धनुषचे पात्र शंकर एक फ्लाइंग लेफ्टनंट क्रिती सॅननला भेटतो. त्यानंतर दोघांच्या पूर्वाआयुष्यात काय घडले आहे. हे दाखविण्यात येते. धनुषचे पात्र पूर्णपणे एकतर्फी प्रेमाने वेडे झाल्याचे दिसते. क्रिती आणि धनुष पहिल्यांदाच या चित्रपटातून एकमेकांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. या चित्रपटात क्रिती सॅनन धनुषच्या प्रेयसीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
आनंद एल. राय दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर धनुषच्या हिट ठरलेल्या राँझणा चित्रपटाची आठवण येते.
ट्रेलरच्या आधी चित्रपटाचा टीझर आणि गाणीही प्रदर्शित करण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल आणखी उत्सुकता निर्माण झाली. ‘तेरे इश्क में’ हा चित्रपट या वर्षातील प्रदर्शित होणारा तिसरा प्रेमकथेवर आधारित चित्रपट असणार आहे. चित्रपटाची कथा मागील दोन प्रेमकथेवर आधारित चित्रपटांपेक्षा खूपच वेगळी असणार आहे.
हेही वाचा : अक्षय कुमारच्या ‘हैवान’ चित्रपटात साऊथ सुपरस्टारची एन्ट्री; चाहत्यांनी व्यक्त केला आनंद
The post प्रेमासाठी काहीपण! धनुष अन् क्रितीचा ‘तेरे इश्क में’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











