
Shivdeep Lande | ‘बिहारचे सिंघम’ अशी ओळख असलेले धडाडीचे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे बिहार विधानसभा निवडणुकीत उतरले होते. त्यांनी अररिया आणि जमालपूर या दोन विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. मात्र या मतदार संघात त्यांचा पराभव झाला आहे. २०२४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी राजकारणात एन्ट्री केली आणि ‘हिंद सेना’ या राजकीय पक्षाची स्थापनाही केली. मात्र त्यांची पक्षाची नोंदणी होऊ शकली नाही.
जमालपूरमधून शिवदीप लांडे यांचा पराभव
जमालपूरमधून ४९ वर्षीय शिवदीप लांडे यांचा जनता दल (संयुक्त) पक्षाच्या नचिकेत यांनी पराभव केला. नचिकेत यांना ९६,६८३ मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमाकांवर इंडियन इन्क्लूजिव्ह पार्टीच्या नरेंद्र कुमार यांना ६०,४५५ मते मिळाली. शिवदीप लांडे तिसऱ्या स्थानावर होते. त्यांना १५,६५५ एवढी मते मिळाली.
अररिया विधानसभा मतदारसंघातून दारुण पराभव
बिहारच्या अररिया विधानसभा मतदारसंघातूनही शिवदीप लांडे यांनी निवडणूक लढवली होती. अररिया विधानसभा मतदारसंघात शिवदीप लांडे यांचा दारूण पराभव झाला. काँग्रेस पक्षाच्या अबीदूर रहमान यांनी ९१,५२९ मते घेऊन याठिकाणी विजय मिळवला. तर एमआयएम पक्षाचे मोहम्मद मन्झूर आलम हे तिसऱ्या स्थानावर होते, त्यांनी ५३,४२१ मते घेतली. तर शिवदीप लांडे यांना केवळ ४,०८५ मते मिळवून ते चौथ्या स्थानवर होते. Shivdeep Lande |
कोण आहेत माजी IPS शिवदीप लांडे?
माजी आयपीएस शिवदीप लांडे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. शिवदीप लांडे यांचे शिक्षण अकोला जिल्ह्यात झाले. त्यांनी शेगावमधील श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक केले. यानंतर यूपीएससीची तयारी करण्यासाठी ते मुंबईत आले. २००६ साली ते आयपीएससाठी निवडले गेले. त्यांची पहिलीच पोस्टिंग नक्षल प्रभावित असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली. यानंतर लांडे यांनी पटना, अररिया, पूर्णिया, रोहतास अशा अनेक जिल्ह्यांमध्ये विविध पदावर काम केले. येथे त्यांनी दबंग अधिकारी, सिंघम अशी ओळख मिळवली. Shivdeep Lande |
महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिनियुक्ती
शिवदीप लांडे यांची नियुक्ती काही काळासाठी महाराष्ट्रातही करण्यात आली होती. लांडे यांची महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्रात असताना अमली पदार्थ विरोधी पथक, दहशतवादी विरोधी पथकात लांडे यांनी सेवा दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुलगी ममता यांच्याशी शिवदीप लांडे यांचे २०१४ साली लग्न झाले. Shivdeep Lande |
हेही वाचा:
राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांची जोडी बिहारमध्ये अपयशी; पराभूत होण्यामागची कारणे कोणती ?
The post शिंदेसेनेतील आमदाराच्या जावयाला बिहारने नाकारलं; खाकी सोडून राजकारणात एन्ट्री घेताच पदरी पडली निराशा appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











