
प्रभात वृत्तसेवा
पुणे – कात्रज परिसरातील एका ३१ वर्षीय तरुणाची ओळखीतील कुटुंबाने विवाहाचे आमिषाने भागीदारीत शोरूम उघडण्यासाठी पैसे काढले त्यानंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सुमारे ३८ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पीडित ऋषिकेश दत्तात्रय थोरात (३१, रा. गोकुळनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार कैलास रामचंद्र माने (रा. बावधन), त्यांची पत्नी आणि दोन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रेटाकारचे स्टेटस पडले महागात
एप्रिल २०२४ मध्ये ऋषिकेश यांनी क्रेटा कार घेतल्यानंतर त्यांच्या आईने कारचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवले. हे फोटो पाहून त्यांचे नातेवाईक कैलास माने (रा. बावधन) यांनी थोरात कुटुंबाशी संपर्क साधला आणि आपल्या मुलीचे स्थळ सुचवले. स्थळ पसंत पडल्यानंतर माने यांनी, मला मुलगा नाही, आपण शोरूम भागीदारीत काढू, असे सांगत तरुणाकडून वेळोवेळी ऑनलाईन पैसे घेतले.
यामध्ये शोरूमचे डिपॉझिट, कागदपत्रे, कर्मचारी पगार अशा नावाखाली एकूण ३७ लाख ६५ हजार रुपये घेतले. परंतु प्रत्यक्षात शोरूम अधिकृत नसल्याचे आणि कोणतीही गाडी किंवा माल खरेदी करण्यात आला नसल्याचे तक्रारदारास नंतर समजले.दरम्यान, २ ऑगस्ट २०२५ रोजी ऋषिकेश थायलंडमध्ये गेला असताना त्याच्या घराची खोटी चावी बनवून कैलास माने घरात घुसले होते. तेव्हा कपाटातील रोख ५० हजाराची रक्कम चोरीला गेली.
यानंतर त्यांच्या मुलीने व्हिडीओ कॉलवर तुझा अश्लील व्हिडीओ आमच्याकडे आहे, पैसे दिले नाहीस तर व्हायरल करू अशी धमकी दिली. भीतीपोटी त्याने ७२ हजार रुपये जीपेवर पाठविले होते. . यानंतर माने कुटुंबीयांनी “लग्न ठरले असताना, आम्ही याला दुसऱ्या मुलीसोबत पकडले असे खोटे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.
The post नातेवाईकच निघाले महाठग! आधी लग्नाच्या जाळ्यात ओढलं, मग अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी..वाचा संपूर्ण प्रकरण appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











