
प्रभात वृत्तसेवा
पुणे – नवले पुलावर झालेल्या धक्कादायक अपघातानंतर वाहतूक सुरक्षेसंदर्भात तातडीच्या उपाययोजना ठरवण्यासाठी उद्या (शनिवारी) सकाळी ११ वाजता सिव्हील सर्किट हाऊस येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ भूषवणार असून, पीएमआरडीए, पीएमसी, पीडब्ल्यूडी आणि एनएचएआय या सर्व महत्त्वाच्या यंत्रणांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नवले पुलावरील अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दीर्घकालीन व तत्काळ उपाययोजना राबवण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. मोहोळ यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आदी घटनास्थळी उपस्थित होते.
नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर या भागात होणारे अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. आपत्कालीन उपाययोजनेसंदर्भात विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी शनिवारी (१५ नोव्हेंबर) बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. नऱ्हे ते रावेत (सुतारवाडीमार्गे) दम्यान उन्नत पुलाचा प्रकल्प आराखडा मंजूर झाला आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोहोळ म्हणाले, नवले पूल परिसरात झालेल्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत यापूर्वी पुण्यात, तसेच दिल्लीतही बैठक झाली होती. दरी पूल ते सुतारवाडी (पाषाण), सुतारववाडी ते रावेत या ३२ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) करण्याचा निर्णय घेण्यात आहे. त्याचा आरखडा मंजूर झाला आहे. या कामाला गती देण्यासाठी गडकरी यांची भेट घेण्यात येणार आहे.’
अपघातानंतर तत्काळ खालील अंमलबजावणी
-नवले पूल परिसरात रम्बलर्सची संख्या वाढविणे
-वेगमर्यादा नियंत्रणासाठी स्पीड गन्सची संख्या वाढविणे
-खेड-शिवापूर टोलनाक्यावर अवजड व ओव्हरलोड वाहनांची विशेष तपासणी सुरू करणे
दीर्घकालीन उपाय
नऱ्हे (अक्षरधाम मंदिर) – सुतारवाडी – रावेत असा उन्नत कॉरिडोर प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी समन्वय साधला जाणार असून, लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा संकल्प यावेळी करण्यात येणार आहे.
The post नवले पूल अपघातानंतर समन्वय बैठक : आज सकाळी ११ वाजता सर्किट हाऊस येथे आपत्कालीन चर्चा appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











