
प्रभात वृत्तसेवा
राजगुरुनगर – राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी अध्यक्षपदासाठी एकही उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला नाही. तर नगर सेवक पदासाठी मात्र आज 9 उमेदवारांनी 12 अर्ज दाखल झाले आहेत. आजपर्यंत 16 उमेदवारांनी 22 अर्ज दाखल केले आहेत.राजगुरुनगर नगर परिषद निवडणुक रणधुमाळी सुरू झाली आहे. तथापि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोनच दिवस उरले आहेत.
सोमवारी (दि. 17) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. नगर परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पाच दिवसांत एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी निरंक आहे. नगर सेवक पदासाठी आतापर्यंत 16 उमेदवारांनी 22 अर्ज दाखल केले आहेत. त्यात शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्जाची संख्या जास्त आहे.
आज (दि. 14) पाचव्या दिवशी प्रभाग क्रमांक दोन मधून बाळासो शंकर सांडभोर यांनी अपक्ष, प्रभाग क्रमांक चार मधून निलेश बाळासाहेब गवते अपक्ष, धीरज विजय आदक शिवसेना, प्रभाग क्रमांक पाच मधून ज्योती संदीप वाडेकर शिवसेना, प्रभाग क्रमांक सहा मधून संतोष मारुती सांडभोर शिवसेना, प्रभाग क्रमांक सात मधून बाळू जयराम डोके शिवसेना व अपक्ष.
प्रभाग क्रमांक नऊमधून कविता सुनील वाळुंज अपक्ष, सागर वसंतराव सातकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व अपक्ष, नितीश सतीश ओसवाल भारतीय जनता पक्ष व अपक्ष असे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.
The post राजगुरुनगरमध्ये अध्यक्षपदासाठी सन्नाटा, नगरसेवकपदासाठी मात्र रांगा! अर्ज भरण्यास दोनच दिवस शिल्लक appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











