
Tejashri Pradhan | अभिनेत्री तेजश्री प्रधानने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर सध्या ती ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत स्वानंदीच्या भूमिकेत दिसत आहे. अल्पावधीतच या मालिकेला देखील मोठी लोकप्रियता मिळाली. याच दरम्यान तिने तिच्या नव्या प्रोजेक्टची हिंट दिली होती. त्यानंतर तेजश्री मालिका सोडणार अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली होती. मात्र त्या अफवा असल्याचे तिने स्पष्ट केले.
तेजश्रीचा नव्या प्रोजेक्टचा शुभारंभ होत असला तरी तिची मालिकाही सुरू राहणार असल्याचे पुढे आले. आता यानंतर तेजश्रीने तिच्या अधिकृत अकाऊंटवरून नव्या कामाचे आणखी अपडेट्स सुरू केले असून त्या भूमिकेबद्दल, तिचं नाव काय असेल याबद्दलही खास फोटोतून माहिती शेअर केली आहे.
View this post on Instagram
sp;
तिच्या नव्या प्रोजेक्टला, एका वेबसीरिजला सुरूवात झाली आहे. तेजश्रीच्या हातातील क्लॅपवरून दिसत होते. त्यासोबतच तिचेन खास कॅप्शन लिहीत तिच्या भूमिकेचं नावही जाहीर केलं. ‘दियाला भेटा’ असं तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. म्हणजे या नव्या प्रोजेक्टमध्ये तेजश्री जी भूमिका साकारत आहे, तिचं नाव दिया असेल हे समोर आलं. या भूमिकेबद्दल आणखी अपडेट्स लवकरच शेअर करेन असंही तेजश्रीने लिहीलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या हजारो लाईक्स, कमेंट्स आल्या आहेत. अनेकांन तिला नव्या कामासाठी शुभेच्छा देत, अभिनंदनही केलं आहे. Tejashri Pradhan |
तेजश्री ज्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तो हिंदी आहे मराठी आहे, तिच्याबरोबर कोणते कलाकार दिसणार? कथानक काय असणार आहे? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा:
The post अभिनेत्री तेजश्री प्रधानची नवी सुरुवात; भूमिकेचे नाव सांगत शेअर केला हटके लुक appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











