महापालिकेचा कौतुकास्पद उपक्रम! दिव्यांग रोजगार मेळाव्यातून अनेकांच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी –
दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी दिव्यांग भवन फाउंडेशनमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिव्यांग युवकांना रोजगार, नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी ‘सेन्टर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत बांधवांचा पहिला रोजगार मेळावा दिव्यांग भवन येथे घेण्यात आला. या रोजगार मेळाव्यासाठी एकूण ५८७ दिव्यांग उमेदवारांनी नावनोंदणी केली होती.

रोजगार मेळाव्यापूर्वी दिव्यांग उमेदवारांना आणि त्यांच्या पालकांना प्रशिक्षण व समुपदेशन याद्वारे मुलाखतीसाठी आवश्यक पूर्वतयारीही करून घेण्यात आली होती.दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळाव्यांतर्गत स्पार्क मिंडा आणि बिग बास्केट या दोन कंपन्यांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या. या रोजगार मेळाव्यासाठी एकूण ५८७ उमेदवारांनी नावनोंदणी केली होती, त्यापैकी महापालिका हद्दीतील १५१ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले.

मुलाखतीत ६४ उमेदवारांनी सहभाग नोंदविला. यामध्ये २२ उमेदवार अस्थिव्यंग, ३३ विशेष दिव्यांगत्व, लो व्हिजन प्रवर्गातील २, मूकबधिर प्रवर्गातील ७ आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश होता. बिग बास्केट कंपनीसाठी २२ उमेदवारांनी मुलाखत दिली असून त्यापैकी ११ उमेदवारांची निवड झाली.

तर स्पार्क मिंडा कंपनीसाठी ४५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून त्यापैकी १४ उमेदवारांची निवड करण्यात आली. महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांग युवकांना योग्य संधी मिळावी यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. दर्शना फडतरे यांनी सूत्रसंचालन केले, तर कुणाल बनुबाकोडे यांनी आभार व्यक्त केले.

“दिव्यांग युवकांनी कधीही आपल्या स्वप्नांना मर्यादा घालू नका. तुम्हाला जे करायचं आहे, जसं बनायचं आहे, त्यासाठी मनापासून प्रयत्न करा. आयुष्यात आलेल्या प्रत्येक संघर्षामुळे तुमच्यात एक वेगळंच, दिसत नसलेलं पण खूप मजबूत सामर्थ्य तयार झालं आहे. तेच सामर्थ्य आज तुमचं खऱ्या अर्थानं बळ आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमची क्षमता दाखवण्याची एक छान संधी आहे. आत्मविश्वासाने बोला, आपली कौशल्यं वाढवत राहा आणि प्रत्येक अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहिलात तर यश नक्कीच मिळेल.”
– निवेदिता घार्गे, सहाय्यक आयुक्त, दिव्यांग कक्ष

The post महापालिकेचा कौतुकास्पद उपक्रम! दिव्यांग रोजगार मेळाव्यातून अनेकांच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!