पुण्यातील जमीन प्रकरण : पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही? अजित पवार म्हणाले…

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Ajit Pawar : पुण्यातील कोरगाव पार्क जवळील सरकारी जमीन खरेदी केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात धक्कादायक माहिती सातत्याने समोर येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नेमली आहे.

आतापर्यंत या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. या गैरव्यवहारात पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या अमेडिया कंपनीचे नाव समोर आले असून, ९९ टक्के भागीदारी असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होण्याऐवजी १ टक्का भागीदारी असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो. यामुळे साहजिकच सुरू असणाऱ्या कारवाईवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

या प्रकरणी अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. पण पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार यांनी महत्वपूर्व माहिती देत प्रतिक्रिया दिली आहे. या जमीनीचा व्यवहाराच्या संबंधित कगदपत्रे रद्द करण्यात आली आहेत. पण २१ कोटी रुपये कंपनीला भरावे लागणार आहेत, आता नव्या माहितीनुसार ही ४२ कोटी रुपये रक्कम भरावी लागणार असल्याची नवी माहिती समोर आली आहे.

अजित पवार काय म्हणाले?  

या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून, एका महिन्यात अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती देत पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही, या प्रश्नावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत ज्यांनी या व्यवहारावर सह्या केल्या, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

पुढे अजित पवार म्हणाले, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कार्यालयात येऊन सह्या करणाऱ्यांवर एफआयआर दाखल झाल्याचे सांगितले आहे. यात एकही पैशाचा व्यवहार झाला नसतानाही नोंदणी कशी झाली, याची सखोल चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ही जमीन सरकारी आणि महार वतनाची असल्याने तिचा व्यवहार होऊ शकत नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना प्रताप सरनाईकांचे खुले आव्हान म्हणाले “आधी पुरावे…”

The post पुण्यातील जमीन प्रकरण : पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही? अजित पवार म्हणाले… appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!