महाबळेश्वर येथे काळभैरवनाथ जयंती उत्साहात

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील गणेश नगर गृहनिर्माण सोसायटी येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये काळभैरवनाथ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सत्यनारायण महापूजा, भजन, हरिपाठ, हळदी कुंकू तर संध्याकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

तद्नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरास आकर्षक सजावट करण्यात आली होती. काळभैरवनाथ जयंती साजरी करण्याचे हे सलग दुसरे वर्ष असून या वेळी भाविकांनी दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.

जयंती साजरी करण्यासाठी गणपत हरिभाऊ कदम (वाघळे), कदम आणि वाघळे परिवार, गणेश नगर हौसिंग सोसायटी, जननी माता सोसायटी, दत्त हौसिंग सोसायटी, जय भवानी मित्र मंडळ, जय भवानी महिला मंडळ यांनी सहभाग घेतला.

The post महाबळेश्वर येथे काळभैरवनाथ जयंती उत्साहात appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!