
यशवंतनगर : महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश संचालन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या कृषी क्षेत्र संपर्क समन्वयकपदी रामकृष्ण वेताळ यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यभरात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने उमेदवार निश्चिती व निवडणूक रणनीती तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे सर्वाधिकार या समितीकडे असणार आहेत. या प्रदेश संचालन समितीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री प्रवीण दरेकर, आ. श्रीकांत भारतीय, माधवी नाईक, आ. विक्रांत पाटील, माधव भंडारी, केशव उपाध्ये, नवनाथ बन, आ. चित्राताई वाघ, आ. प्रसाद लाड, आ. योगेश सागर यांचा समावेश आहे.
रामकृष्ण वेताळ यांची पक्षाने पक्षाने निवड केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सातारा जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले, आ. मनोज दादा घोरपडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
The post भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या संचालन समिती राज्य संपर्क समन्वयकपदी रामकृष्ण वेताळ appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











