
1) पुण्यातील नवले पुल अपघातात अख्य कुटुंबचं ठरलं बळी; देवदर्शन करून परतताना काळाची झडप
पुण्यातील नवले पुलावर अपघातांचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही आहे, गेल्या काही वर्षात अनेक मोठे अपघात या ठिकाणी झाले आहे. अनेकांनी आपले जीव येथे झालेल्या अपघातात गमावलेले आहेत. कालची संध्याकाळ भीषण अपघाताची ठरली. नवले पुलावरील विचित्र अपघातात आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर २० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातातील मृतदेहांची ओळख पटली असून त्यांची नावे देखील समोर आली आहेत. स्वाती नवलकर (वय ३७ ) त्यांची आई शांता दाभाडे आणि वडील दत्तात्रय दाभाडे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मयत तीन वर्षाची मुलगी ही स्वाती नवलकर यांच्या मैत्रिणीची मुलगी होती. धनंजय कोळी हा चालक होता
धायरीतील दाभाडे कुटूंब हे काल नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. मात्र परतताना घरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असताना कुटुंबावर काळाने झडप घातली आणि काही क्षणातच व्होत्याच नव्हतं झाले आणि कुटुंब भीषण अपघाताचे बळी ठरले.
2) बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये NDA ची घौडदौड Thumping Mejority कडे सुरुये…
हाती येत असलेल्या कलांनुसार, एकूण २४३ जागा असलेल्या बिहार विधानसभेमध्ये – NDA मधील पक्षांचे २०० हून अधिक उमेदवार आघाडीवरयेत. विरोधकांच्या महागठबंधनला मात्र मोठ्या पराभवाचा धक्का बसल्याचेच कलांमधून स्पष्ट होतंय. भाजप, जनता दल युनायटेड आणि चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष – हे NDA चे प्रमुख घटक पक्षयेत. भाजप ९१ जागांवर नितीश कुमारांची जेडीयू ८४ तर एलजेपी २० जागांवर आघाडीवरय…
विरोधकांची मात्र या निवडणुकांमध्ये दाणादाण उडालीये.
लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला केवळ ३३ जागांवर आघाडी मिळताना दिसतेय… बिहारच्या जनतेने देखील काँग्रेसला नाकारल्याचंच चित्र असून राज्यात काँग्रेसचे केवळ ५ उमेदवार आघाडीवरयेत. विरोधकांचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांची देखील चांगलीच दमछाक होताना दिसतेय.. दोन टप्प्यात पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर करण्यात येतायेत. आज रात्री उशिरापर्यंत निवडणूक निकालांच संपूर्ण चित्र स्पष्ट होणारेय. मात्र सध्या हाती आलेल्या कलांमध्ये तरी भाजप प्रणित NDA ला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय…
3) इंदुरीकर महाराजांनी दिले कीर्तन सोडण्याचे संकेत; तृप्ती देसाईंनी दिला अजब सल्ला
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात आली. त्याला कारण होते, त्यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा शाही थाटात पार पडलेला साखरपुडा. या सोहळ्यावरून महाराजांना त्यांच्या कीर्तनातील एका वाक्याची आठवण नेटकऱ्यांनी करून देत त्यांना ट्रोल केले. साध्या पद्धतीने लग्न केलं तरी मुलं होतात असे अजब विधान महाराजांनी केले होते. या विधानातून लग्नाचा खर्च टाळण्याचा सल्ला त्यांनी लोकांना दिला होता.
मात्र, त्यांनी स्वतः मुलीच्या साखरपुडा सोहळ्यासाठी मोठा खर्च केला. सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. या सगळ्यातून उद्विघ्न होत इंदुरीकर महाराज यांनी थेट आता कीर्तन सोडण्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “इंदोरीकर महाराज तुम्हाला कीर्तन सोडायचं की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे, पण कीर्तन सोडून तुम्ही कॉमेडी शो सुरू करा,” असा अजब सल्ला त्यांनी दिला आहे.
4) सुप्रिया सुळेंनी घेतली CM फडणवीसांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण-
आज बिहार विधानसभेच्या निकालाचा दिवस असल्याने सर्वत्र धामधुमीचे वातावरण असताना महाराष्ट्रात मात्र एक मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. वर्षा निवासस्थानी फडणवीसांची भेट सुप्रिया सुळे घेतली असून चर्चांना उधाण आले होते.
या भेटी मागचे कारण समोर आले आहे. सुप्रिया सुळे या त्यांचा भाचा युवा नेते युगेंद्र पवार यांच्या विवाहसोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लग्नाची पत्रिका देत आमंत्रित केले आहे.
5) बिहार निवडणुकीत अजित पवारांचा धुव्वा; उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त होणार?
बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतमोजणी प्रक्रियेला वेग आला असून, सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने स्पष्टपणे दिसत आहेत. दुपारपर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीएला २०० जागांवर आघाडी मिळाली असून, त्यांची वाटचाल बहुमताच्या पलीकडे असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, महागठबंधन अवघ्या ३९ जागांवर आघाडीवर असून, त्यांना मोठा धक्का बसला आहे.
या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवण्याच्या आशेने उतरलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट)ला मात्र अपेक्षेपेक्षा मोठा फटका बसला आहे. पक्षाच्या एकाही उमेदवाराला दखलपात्र कामगिरी करता आलेली नाही आणि डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
6) कटकमध्ये श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी; एक महिला बेशुद्ध, पोलिसांचा लाठीचार्ज
ओडिशातील कटक येथे आयोजित करण्यात आलेल्या बालीयात्रा सांस्कृतिक महोत्सवात गुरुवारी रात्री गायिका श्रेया घोषाल यांच्या कॉन्सर्टदरम्यान गंभीर गोंधळ निर्माण झाला. मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या प्रेक्षकांच्या चेंगराचेंगरीसदृश परिस्थितीमध्ये एक महिला बेशुद्ध झाली, तर एक जण जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आली.
कॉन्सर्ट सुरू होण्यापूर्वीपासूनच मैदानात मोठा जमाव जमा झाला होता. श्रेयाचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक अक्षरशः रंगमंचाजवळ जाण्यासाठी धावत होते. अनेक प्रेक्षक स्टेजच्या अगदी जवळ उभे राहण्यासाठी धडपडत होते. आधीच जवळ असलेले लोक जागा सोडायला तयार नव्हते. मागून आणखी लोक ढकलत आल्याने धक्काबुक्की वाढली. गर्दीची घुसमट वाढल्याने काही स्त्रिया चक्कर येऊन कोसळल्या. त्यापैकी एक महिला जागेवरच बेशुद्ध झाली. काही प्रेक्षक जखमी झाल्याचंही वृत्त आहे.
7) नागरोटा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय; देवयानी राणा २४,६४७ मतांनी विजयी
जम्मू आणि काश्मीरमधील नागरोटा जागेसाठी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केले आहेत. भाजपच्या देवयानी राणा २४,६४७ मतांनी विजयी झाल्या, त्यांना एकूण ४२,३५० मते मिळाली. हर्ष देव सिंह (जम्मू आणि काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टी इंडिया) १७,७०३ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नॅशनल कॉन्फरन्सच्या शमीम बेगम १०,८७२ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. देवयानी राणांचे वडील देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. भाजपने देवयानी यांना तिकीट दिले आणि त्या जिंकल्या.
8) नीतीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील; ‘जेडीयू’कडून आधी ट्वीट नंतर डीलीट
Bihar Election Results 2025 : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीए भव्य विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अंतिम निकाल येण्यासाठी काही वेळ लागणार असला, तरी निकालापूर्वीच जेडीयूने मोठा राजकीय संदेश देत नीतीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असा दावा केला आहे. दुसरीकडे, भाजपकडून मात्र अद्याप मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
यंदाच्या निवडणुकीत भाजपचे प्रदर्शन जेडीयूपेक्षा चांगले दिसत आहे. जेडीयूने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) हँडलवर पोस्ट करत म्हटले आहे, “न भूतो न भविष्यति… नीतीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील.” या ट्विटद्वारे जेडीयूने स्पष्ट संकेत दिले की एनडीएमध्ये भाजप भलेही जास्त जागा जिंकत असेल, पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलणार नाही.
9) ‘National Crush’ झालेल्या गिरिजा ओकला वाटतेय भीती; म्हणाली माझा १३ वर्षांचा मुलगा…
मराठी आणि हिंदी मालिका-चित्रपट आणि रंगभूमी गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे “गिरिजा ओक-गोडबोले’. सौंदर्याबरोबरच आपल्या अभिनयाच्या बळावर गिरिजा ओकने चित्रपट सृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या सोशल मीडियावर जिकडे तिकडे गिरिजा च दिसत आहे. रातोरात गिरीजा ‘नॅशनल क्रश’ म्हणून व्हायरल झाली आहे.
मात्र, तिच्या फोटोंची छेडछाड करून, फॉर्फ फोटो व्हायरल करून तिची इमेज खराब करण्याचा प्रयत्नही होत आहे. यासंदर्भात आता तिनं व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती म्हणते की, अचानक इतकं प्रेम मिळतंय, मेसेज येतायत, फोन येतायत…भारी वाटतंय, त्यासाठी आभारी आहेत. अनेकांनी मीम्स पाठवलेत.
पण यासोबतच काही फोटो, व्हिडिओ एआयच्या माध्यमातून एडिट करूनही व्हायरल केले जात आहेत, ते अश्लील आहेत. विशेषता बायकांचे, पुरुषांचे फोटो व्हायरल केले जातात. तुमच्या पोस्टवर क्लिक करावं यासाठी हे सगळं केलं जातं. यासाठी कोणतेही नियम नाहीयेत. मला याची भीती वाटतेय.
10) बुमराहचा भेदक मारा, दक्षिण आफ्रिका ऑलआऊट; पहिला दिवस भारताने गाजवला-
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवस अखेर यजमान संघाने पहिल्या डावात १ बाद ३७ धावा केल्या आहेत.
केएल राहुल १३ धावांवर आणि वॉशिंग्टन सुंदर सहा धावांसह खेळत होते. भारत सध्या दक्षिण आफ्रिकेपेक्षा १२२ धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी, टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा पहिला डावात १५९ धावांवर गारद झाला. ज्यामध्ये जसप्रीत बुमराहने सर्वाधिक विकेट्स ५ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली.
The post पुण्यातील नवले पुल अपघात ते बिहार निवडणुक निकाल; वाचा आजच्या टॉप १० बातम्या, एका क्लीकवर… appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











