बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रोहनच्या नावाने वाचनालय, माजी आमदार अशोक पवारांकडून ५० हजारांची मदत

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

जांबुत : पिंपरखेड (शिरूर ) येथे इयत्ता सातवीत शिकत असलेला तेरा वर्षीय रोहन विलास बोंबे याचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात मोठा उद्रेक झाला होता. या घटनेने संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे अखेर शासन स्तरावरून बिबट्या संदर्भात ठोस उपाययोजना करण्याचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

या पार्श्वभूमीवर, रोहनची आठवण कायम राहावी यासाठी, माजी आमदार अशोक पवार यांनी पिंपरखेड जिल्हा परिषद शाळेत त्याच्या नावाने वाचनालय सुरू करण्यात यावे, अशी सुचना करत वाचनालयासाठी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली.

माजी आमदार अशोक पवार यांनी रोहनच्या शोकसभेला हजेरी लावून जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आणि दुःख व्यक्त केले. रोहन हा खरोखरच गुणी आणि हुशार विद्यार्थी होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे शासनाला बिबट्याच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची वेळ आली.

रोहनची आठवण म्हणून आणि इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्याच्या नावाने शाळेत वाचनालय सुरू करण्यात यावे. मी यासाठी ५० हजार रुपये मदत देतो आणि अजून काही मदत लागल्यास ती देखील करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

रोहनच्या मृत्यूने बिबट्या प्रश्नाला मिळालेल्या गांभीर्यामुळे प्रशासनाला मोठी पाऊले उचलण्यास भाग पाडले आहे. रोहनच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शाळेच्या आवारात माजी आमदार अशोक पवार, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी यांच्या हस्ते एक आंब्याचे झाड लावण्यात आले. रोहन नेहमीच शाळेच्या उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेत असे.

त्याची ही आठवण या झाडाच्या रूपात शाळेत कायम राहील, असे उपस्थित शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी राजेंद्र गावडे, अरूणा घोडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद बोंबे, रोहन चे वडील विलास बोंबे, बाळासाहेब डांगे, अशोक दाते, माऊली ढोमे, बाळशिराम ढोमे तसेच शालेय विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

The post बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रोहनच्या नावाने वाचनालय, माजी आमदार अशोक पवारांकडून ५० हजारांची मदत appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!