
Maithili Thakur | अलीनगर विधानसभेतील भाजप उमेदवार मैथिली ठाकूर विरुद्ध आरजेडी उमेदवार विनोद मिश्रा यांच्यातील लढत चर्चेत आहे. भाजपनं अलीनगर मतदारसंघातून गायिका मैथिली ठाकूर यांना उमेदवारी दिली. लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर 25 वर्षांची असून, त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर मैथिली यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात विनोद मिश्रा अलीनगरमधील स्थानिक उमेदवार आहेत.
बिहार निवडणूक निकालांमधील सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, मैथिली तिच्या अलीनगर मतदारसंघात आघाडीवर आहे. याबाबत एका मुलाखतीदरम्या त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मैथिली यांनी म्हटलं की, “मला माझं यश दिसत आहे. मी तुमच्या बातम्यांमधून ते पाहत आहे आणि काही काउंटींग एजंट मला सांगत आहेत की, मी अलीनगर मतदारसंघात आघाडीवर आहे. मी आता टीव्हीसमोर बसली आहे आणि मी गेल्या निवडणुकांमध्ये निकालांमध्ये चढ-उतार पाहिले आहेत. म्हणूनच जोपर्यंत मला विजयाचं सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत मी पूर्णपणे समाधानी होणार नाही.” Maithili Thakur |
प्रचारावेळी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात
लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर लोकगीतांसाठी ओळखल्या जातात आणि बिहारमध्ये त्या खूप प्रसिद्ध आहे. मैथिली ठाकूर यांना अलीनगरमधून भाजपनं उमेदवारी दिली. तेव्हापासूनच अलीनगरची विधानसभा निवडणूक सर्वांसाठी चर्चेचा विषय झाली. त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार देखील केला. निवडणूक प्रचारावेळी मैथिली अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. ‘ब्ल्यू प्रिंट विवाद’मुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती. Maithili Thakur |
हेही वाचा:
“१०वी बार.. फिरसे नितीश सरकार” ; बिहारच्या ‘लाडक्या बहिणी’ बनल्या नितीशकुमारांची ढाल
The post “माझं यश दिसतयं, पण विजयाचं सर्टिफिकेट….”; मैथिली ठाकूर यांची आघाडी घेताच प्रतिक्रिया समोर appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











