
Tabu : अभिनेत्री तब्बू ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यावेळी प्रस्थापित असलेल्या अभिनेत्रींच्या शर्यतीत तिचे नाव घेतले जाऊ लागले. तब्बूने फार नाही पण काही मोजकेच चित्रपट बॅालिवूड इंडस्ट्रीला दिले. त्यावेळीच्या अनेक लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर तब्बू मोठ्या पडद्यावर झळकली. आजही तब्बू चित्रपटसृष्टीत सक्रिय असून अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे.
तब्बूला एका मुलाखतीत जनरेशन झेडबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अभिनेत्रीने मोजक्याच शब्दांत खूप छान उत्तर दिले. आज जनरेशन झेड अभिनेत्री म्हणून तू पदार्पण केले तर काय होईल? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. “मला वाटत नाही मी आता ते करू शकले असते. मी ज्यावेळी एंन्ट्री केली त्याबद्दल मी आनंदी आहे.” असे उत्तर तिने दिले. तब्बूने पहिल्यांदा देव आनंदच्या ‘हम नौजवान’ या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात तिने देव आनंदच्या मुलीची भूमिका साकारली होती.
तिने 1994 मध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत पेहला पेहला प्यार या चित्रपटातून लीड कलाकार म्हणून काम केले. तब्बुला विजयपथ चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. तर माचिस चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. साजन चले ससुराल, तू चोर में सिपाही, जीत आणि विरासत यांसारख्या चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारलेल्या आहेत. ९०शेवटची ‘और में कहाँ दम था’ या चित्रपटात दिसली होती. ती आता अक्षय कुमारच्या भूत बंगला चित्रपटात दिसणार आहे. तब्बूच्या खाजगी जीवनाविषयी बोलायचे झाल्यास ती अजूनही अविवाहित आहे.
हेही वाचा : राघोपुरमध्ये ‘काटे की टक्कर’; तेजस्वी यादव यांनी डाव पलटला अन् पुन्हा घेतली आघाडी
The post “मला वाटत नाही की मी आता…” ; ‘त्या’ प्रश्नावर उत्तर देताना तब्बू नेमकं काय म्हणाली? appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











